इस्लामाबाद, 3 एप्रिल : पाकिस्तानच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ (Political Crisis in Pakistan) झाली आहे. कॅबिनेट सचिवालयानं इम्रान खान (Imran Khan) यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याची अधिसूचना जारी केली आहे.
मागील आठवड्याहून अधिक काळ घडलेल्या असंख्या घडामोडींनंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमधून (Islamabad) मोठी बातमी आली आहे. पाकिस्तानच्या कॅबिनेट सचिवालयानं (Pakistan Cabinet Secretariat) इम्रान खान यांना तत्काळ प्रभावानं पंतप्रधान पदावरून हटवण्याची अधिसूचना जारी केली आहे.
ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे. त्याचवेळी इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरनं फेटाळला. यानंतर इम्रान खान त्यांना सत्तेतून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नातून बचावले.
हे वाचा - मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा खेळाडू.. इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार
डेप्युटी स्पीकरनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांनी तो 'असंवैधानिक' ठरवला. तसंच, नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याच्या विरोधात विरोधकांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यानंतर, रविवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याच्या विरोधकांच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली. पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले की, नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे सर्व आदेश आणि कृती न्यायालयाच्या आदेशांच्या अधीन असतील.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे 342 सदस्य आहेत. बहुमतासाठी 172 चा पाठिंबा आवश्यक आहे. इम्रान खान यांना 142 सदस्यांचा पाठिंबा आहे. तर विरोधकांना 190 सदस्यांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानात 90 दिवसांच्या आत निवडणुका होतील असा आदेश माहिती मंत्रालयाने जारी केला आहे.
हे वाचा - पाकिस्तानी पंतप्रधानांचा रडीचा डाव.. म्हणे, अमेरिकेनं धमकी दिली, Imran Khan यांना हटवावं, नाहीतर..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Pakistan