टेक्सास, 16 जानेवारी: अमेरिकेच्या (America) टेक्सासमध्ये (Texas) रंगलेल्या अपहरण नाट्यामुळे (Hostage Drama) पुन्हा एका पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorist) आणि शास्त्रज्ञ अरिफा सिद्दीकी (Arifa Siddiqui) चर्चेत आली आहे. अमेरिकी सैनिकाला (American soldiers) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कैदेत असणाऱ्या अरिफाची सुटका करा, या मागणीसाठी रविवारी एकाने अमेरिकेत अपहरण नाट्य घडवून आणलं. चार ज्यू नागरिकांना एका सिनेगॉगमध्ये ओलीस ठेऊन त्याने अरिफाच्या सुटकेची मागणी केली होती. अपहरणकर्त्याला ठार करण्यात आलं असलं तरी या निमित्ताने पुन्हा एकदा अरिफा सिद्दीकीची चर्चा सुरू झाली आहे.कोण आहे अरिफा सिद्दीकी?2010 साली अमेरिकी सैन्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली तिला शिक्षा सुनावण्यात आली होती. आजही ती अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अल कायदासाठी ती काम करत असल्याचं अमेरिकेच्या कोर्टात सिद्ध झाल्यानंतर तिला तुरुंगात धाडण्यात आलं. वयाच्या अठराव्या वर्षी अरिफा अमेरिकेत शिक्षणासाठी आली आणि तिच्या भावाकडे राहू लागली. न्यूरो सायन्स विषयात तिने पीएचडी मिळवली. 9/11 नंतर रडारवरअमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर अरिफा FBI च्या रडारवर आली. काही मुस्लीम संघटनांसाठी निधी गोळा करणे आणि त्यांच्यासाठी नाईट व्हिजन गॉगल्सची खरेदी करण्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. अमेरिकेतून ती अल-कायदाला मदत करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर 2003 साली ती अमेरिकेतून गायब झाली आणि पाकिस्तानात आपल्या पती आणि मुलांसह राहत असल्याचं आढळून आलं होतं.
हे वाचा -
अफगाणिस्तानमधून अटकत्यानंतर 2008 साली ती अचानक अफगाणिस्तानमध्ये असल्याचं दिसलं. तिथं अमेरिकी फौजांनी तिला अटक केल्यावर तिने त्यातल्याच एका सैनिकाची रिव्हॉल्व्हर घेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिला सैनिकांनी अटक केली आणि कोर्टात सादर केलं होतं.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.