मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लाईट बिल भर नाहीतर जीव दे, डोक्याला बंदूक लावून सैनिकच करतायत वसुली

लाईट बिल भर नाहीतर जीव दे, डोक्याला बंदूक लावून सैनिकच करतायत वसुली

देशात लोकशाही सरकार उलथवून टाकल्यानंतर आलेल्या सैनिकी शासनाच्या काळात म्यानमारची परिस्थिती बिकट झाली आहे.

देशात लोकशाही सरकार उलथवून टाकल्यानंतर आलेल्या सैनिकी शासनाच्या काळात म्यानमारची परिस्थिती बिकट झाली आहे.

देशात लोकशाही सरकार उलथवून टाकल्यानंतर आलेल्या सैनिकी शासनाच्या काळात म्यानमारची परिस्थिती बिकट झाली आहे.

  • Published by:  desk news

म्यानमार, 16 जानेवारी: वीजेच बिल भरा (Electricity bill) किंवा तुमचे प्राण (Life) गमावण्यासाठी तयार राहा, असं म्हणत सैनिकच (Soldiers) वसुली करत असल्याच चित्र म्यानमारमध्ये (Myanmar) दिसत आहे. म्यानमारची आर्थिक परिस्थिती (Economic condition) डबघाईला आली असून मोठं आर्थिक संकट तयार झालं आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये सैन्यानं उठाव करत सरकार उलथवून टाकलं होतं. त्यानंतर सत्तांतर होत म्यानमारमध्ये मिलिटरीची सत्ता आली होती. त्यानंतरच्या 11 महिन्यात राज्यकारभाचं चाक गाळात रुतलं असून परिस्थिती बिकट झाली आहे. 

काय आहे प्रकरण?

गेल्या काही महिन्यात हजारो नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेनं आपली वीजची बिलं भरलेली नाहीत. सामान्यांकडे जगण्यासाठी आणि मूलभूत गरजांसाठीच पैसे नसल्यामुळे वीजेचं बिल कुठून भरायचं, असा प्रश्न आहे. मात्र आता सरकारी तिजोरीतही खडखडात होऊ लागला आहे. त्यामुळे सैन्यानं आता नागरिकांच्या खिशात हात घालायला सुरुवात केली आहे. 

चलनाची किंमत घसरली

म्यानमारचं चलन असणाऱ्या kyat चं मूल्य घसरलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याचा परिणाम म्यानमारच्या तिजोरीवर झाला असून सरकारी गंगाजळी संपत चालली आहे. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांसह जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जिथून उपलब्ध होतील, तिथून पैसे उभे करण्याचे आदेश सैन्याला मिळाले असून सैनिक घरोघर जाऊन सध्या वसुलीची कामं करत असल्याचं चित्र आहे. 

हे वाचा -

अनेक आंदोलकांचा मृत्यू

सैनिकी शासन जाऊन पुन्हा एकदा लोकशाही सरकार देशात यावं, यासाठी जनता आंदोलन करत असल्याचं चित्र म्यानमारमध्ये दिसत आहे. सैनिक आणि पोलिसांच्या हल्ल्यात आतापर्यंत 1466 आंदोलकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी 200 जणांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना चौकशीदरम्यान झालेल्या छळामुळे झाला आहे. देशाची परिस्थिती बिकट असून लोकशाहीवादी सरकारची जनता वाट पाहत आहे. 

First published:

Tags: Electricity bill, Inflation, Military, Myanmar