वॉशिंग्टन, 27 मार्च : लहानांपासून मोठ्यांपर्यंत झुल्यांवर बसायला सर्वांनाच आवडतं. हल्ली तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या झुल्यांमुळं सर्वांनाच यांचा आनंद घेता येतो. मात्र, यामध्ये आनंद जितका मोठा असतो तितकीच खबरदारी घेणंही आवश्यक असतं. झुल्यात बसल्यानंतर नसता खेळ करायला जाणं किंवा झुला सदोष असणं अनेकांच्या जिवावर बेतल्याच्या घटना जगभरात घडल्या आहेत. अमेरिकेतील ऑर्लॅंडो इथं अशाच एका उंच झुल्यावरून (ORLANDO amusement park) पडून एका किशोरवयीन मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. हा मुलगा ज्या थीम पार्क राईडवरून खाली पडला त्याचं नाव ‘ऑर्लॅंडो फ्री फॉल राइड’ (orlando free fall ride) आहे. अपघातानंतर मुलाला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याला वाचवता आलं नाही. हा अपघात झाला, तेव्हा मुलाचे आई-वडील जवळच उभे होते. पाहा video:
सुमारे 120 किलोमीटर प्रतितास या वेगानं हा मुलगा 430 फूट उंचीवरून खाली पडल्याचं सांगण्यात येत आहे. या राईडच्या वेळी मुलानं अंगावर सेफ्टी बेल्ट बांधला होता की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. याबाबत तपास सुरू आहे. रात्री 11 वाजता हा अपघात झाला. उद्यानातील कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर सांगितलं की, सुरुवातीला जेव्हा हा मुलगा खाली पडला, तेव्हा त्यांना वाटलं की झुल्याचा तुकडा पडला आहे. परंतु, नीट पाहिल्यानंतर एक मुलगा खाली पडल्याचं लक्षात आलं. थीम पार्कमधील ड्रॉप टॉवर राईड गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाली. याआधी 2020 मध्ये एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या एका प्रकारच्या राइडवरून पडून मृत्यू झाला होता. हे वाचा - Corona संसर्गाचे इतके भयंकर side effects.. पण तिच्या धैर्यासमोर मृत्यूही हरला पोलीस करत आहेत प्रकरणाचा तपास 430 फूट वर गेल्यावर या राईडमध्ये झुला ताशी 120 किलोमीटर वेगानं खाली येतो. त्याचवेळी हा मुलगा झुल्यातून कसा मोकळा झाला, हा तपासाचा विषय आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या राइड कंपनीचा मालक स्लिंगशॉट ग्रुप आहे. त्याचे सीईओ मीडियाशी बोलताना म्हणाले की, आम्ही संपूर्ण सुरक्षिततेनं राइड चालवतो. सर्व सुरक्षा नियमांचे पालन केलं जातं.

)







