मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दोन्ही हात नसतानाही तिनं घेतली उंच भरारी; सोशल मीडियावर चर्चेत आहे ही बॅले डान्सर

दोन्ही हात नसतानाही तिनं घेतली उंच भरारी; सोशल मीडियावर चर्चेत आहे ही बॅले डान्सर

जन्मापासून हात नसलेली व्हिक्टोरिया बुएनो (Victoria Buano) अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

जन्मापासून हात नसलेली व्हिक्टोरिया बुएनो (Victoria Buano) अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

जन्मापासून हात नसलेली व्हिक्टोरिया बुएनो (Victoria Buano) अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

ब्राझिलिया, 17 फेब्रुवारी :  आपल्या अपंगत्वावर मात करत, एखाद्या क्षेत्रात भरीव कामगिरी करून उत्तुंग यश मिळवणाऱ्या व्यक्ती समाजासाठी एक आदर्श ठरतात. या व्यक्ती अन्य दिव्यांग व्यक्तींसाठी (Handicap Person) देखील प्रेरणा ठरतात. त्यांना जगण्याची नवी उमेद देतात. सध्या ब्राझीलमधील (Brazil) अशीच एक डान्सर सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चेत आहे. या डान्सरचं नाव व्हिक्टोरिया बुएनो (Victoria Buano) असून ती अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. 16 वर्षीय व्हिक्टोरिया बुएनोला जन्मापासूनच हात नाहीत. परंतु तिने डान्सच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या नृत्याचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, हे व्हिडीओ पाहून कोट्यवधी लोक नृत्य (Dancer) शिकत आहेत. जन्मापासून हात नसलेल्या व्हिक्टोरियाने उत्तम डान्सर बघण्याचं स्वप्न पाहिलं, केवळ स्वप्न पाहून ती थांबली नाही तर तिने ते प्रत्यक्षात उतरवलं. रिपोर्टनुसार व्हिक्टोरिया ब्राझीलमधील मिनास ग्रेरैस भागात राहते. व्हिक्टोरिया लहानपणापासूनच उत्तम डान्स करायची. तिच्या फिजिओथेरपिस्टला ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. तेव्हा त्यांनी तिला बॅले डान्सर होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही आणि आज ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. हे वाचा - मिस इंडियाचा मुकुट घातलेली तरुणी रिक्षातून उतरते... मान्याच्या जिद्दीला सलाम! व्हिक्टोरियाने आपला सगळा फोकस डान्सवर ठेवला आहे. ती जॅझचाही आनंद घेते. व्हिक्टोरिया सध्या मिनास ग्रेरैसमधील एका अकादमीत डान्सचे धडे गिरवत आहे. व्हिक्टोरिया जेव्हा लाकडी स्टेजवर आपल्या डान्सची कमाल दाखवते, तेव्हा तिला हात नाहीत, असं क्षणभरही जाणवत नाही. प्रेक्षक तिचा डान्स बघून अगदी मंत्रमुग्ध होतात. याबाबत ती म्हणते, हात हे माझ्यासाठी फक्त एक तपशील आहेत. मी माझ्या डोळ्यांना फाॅलो करते. माझे स्किल पाहून मला हातांची गरज नाही, असं मला वाटतं. व्हिक्टोरियाने डान्सच्या माध्यमातून केवळ स्वप्नच पूर्ण केलं नाही तर त्याद्वारे तिला मिळालेली लवचिकता आणि शारीरिक शक्ती तिच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. व्हिक्टोरिया स्वतः टुथब्रशने दात घासते. सुपर मार्केटमध्ये (Super Market) जाऊन पायांच्या सहाय्याने साहित्य खरेदी करते. याबाबत तिचे सावत्र वडील जोसे कार्लैस म्हणतात, जी कामं मी माझ्या हातांनीही करू शकत नाही, ती कामं व्हिक्टोरिया तिच्या पायांच्या मदतीनं सहज करते. हे वाचा - प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत सध्या व्हिक्टोरियाचे इन्स्टाग्रामवर (Instagram) दीड लाख फाॅलोअर्स आहेत. सातत्याने डान्सचे व्हिडीओ (Dance Video) शेअर करून ती आपली कला जगासमोर आणते. या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. लोक तिच्या इच्छाशक्तीला सलाम करतात. तिच्यापासून प्रेरणा घेतात.
First published:

Tags: Ballet dancer, Entertainment, Inspiration, Instagram, Social media, Victoria buano, Video Viral On Social Media

पुढील बातम्या