जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत

प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत

प्रेमासाठी वाट्टेल ते! 3 महिन्यांसाठी कपलनं स्वतःला अडकवलं एकाच बेडीत

प्रेमाची अनोखी परीक्षा देण्याचा निर्णय या कपलनं घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

युक्रेन, 16 फेब्रुवारी : प्रेमाचा धागा, लग्नाची बेडी असं आपण सर्वसामान्यपणे म्हणतोच पण हा धागा आणि ही बेडी अदृश्य असते. ती मनानं बांधलेली असते. पण युक्रेनमधील एका कपलनं चक्क खरी बेडी घातली आहे. दोघांनी स्वतःला एकाच बेडीत अडकवून घेतलं आहे आणि तेसुद्धा प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी. कपल आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी काही ना काही करतात. पण युक्रेनमधील या कपलनं चक्क स्वतःला एकाच बेडीत अडकवून घेतलं आहे. आपलं नातं किती मजबूत आहे, हे तपासण्यासाठी या कपलनं असा अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात झाली ती वॅलेंटाइन डेच्या दिवशी. अलेक्झांडर आणि व्हिक्टोरिया यांनी वॅलेंटाइन डे च्या दिवशी एकमेकांना बेडीत अडकवलं. तेव्हापासून 24 तास एकत्र असतात. हो 24 तास… म्हणजे अगदी टॉयलेट, अंघोळ आणि कपडे बदलतानादेखील ते दोघं ही बेडी उघडत नाहीत. हे वाचा -  तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? मग तुमचं वजन वाढू शकतं! डेली मेल च्या रिपोर्टनुसार सर्वात आधी त्यांची टेस्ट झाली ती म्हणजे ड्रायव्हिंगची. त्यानंतर जेव्हा सार्वजनिक शौचालयात जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना महिला आणि पुरुषांपैकी एका टॉयलेटची निवड करायची होती. त्यावेळी त्यांनी चक्क महिला टॉयलेट निवडलं. म्हणजे दोघंही एकाच टॉयलेटमध्ये गेले. शिवाय आपल्या या परीक्षेत कपडे अडथळा ठरू नयेत, यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारचे कपडेदेखील तयार करून घेतले आहेत. ज्यामुळे त्यांना बेडी खोलण्याची गरजच पडणार नाही. बरं फक्त एक-दोन दिवस नव्हे तर जवळपास तीन महिने ते असंच राहणार आहेत. त्यांच्या या प्रेमाच्या परीक्षेची युक्रेन नॅशनल रजिस्टर रेकॉर्डमध्ये  नोंददेखील ठेवली जाते आहे. हे वाचा -  Healthy Relationship चे पाच फंडे! या गोष्टींतून कळेल तुमचं नातं किती आनंदी… या दोघांचंही वैयक्तिक आयुष्य अजिबात राहिलेलं नाही पण तरी सध्या दोघंही आनंदी आहेत आणि आम्ही तीन महिने असेच राहू, या प्रेमाच्या परीक्षेत पास होऊ असा विश्वास या दोघांनाही आहे. पण जर त्या दोघांनीही तीन महिन्यांआधी वेगळं होण्याचा निर्णय घेत असतील तर मग त्यांना वेगळं तरण्यासाठी आपात्कालीन सेवेची गरज लागणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात