जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मिस इंडियाचा मुकुट घातलेली तरुणी जेव्हा रिक्षातून उतरते... मान्या सिंहच्या जिद्दीला हॅट्स ऑफ

मिस इंडियाचा मुकुट घातलेली तरुणी जेव्हा रिक्षातून उतरते... मान्या सिंहच्या जिद्दीला हॅट्स ऑफ

मिस इंडियाचा मुकुट घातलेली तरुणी जेव्हा रिक्षातून उतरते... मान्या सिंहच्या जिद्दीला हॅट्स ऑफ

Miss India Runner Up चा हा ग्लॅमरस मुकुट डोक्यावर मिरवण्याचा प्रवास मान्यासाठी कमालीचा अवघड आणि थकवणारा होता. तिचे वडील साधे रिक्षा ड्रायव्हर आहेत. आई गृहिणी. घरची परिस्थिती खूपच बेताची.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : आपण अनेकदा पाहतो, झळाळतं यश मिळवणारे अनेकजण कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिथवर पोचलेले असतात. आई-वडिलांची हलाखी, राहण्या-खाण्याची आबाळ अशा सगळ्यातून हे लोक जिद्दीनं काहीतरी करून दाखवतात. मान्या सिंह (Manya Singh) त्यापैकीच एक आहे. मान्या ओमप्रकाश सिंह मूळची उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) देवरिया इथली. वडील रिक्षाचालक (auto driver) आणि आई गृहिणी. मान्या फेमिना मिस इंडिया 2020ची रनर अप (Femina miss India 2020 runner up) म्हणून निवडली गेली. 10 फेब्रुवारीला मुंबईत या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. यात फर्स्ट रनर अपचा मुकुट मान्याच्या डोक्यावर चढवला गेला. हा ग्लॅमरस मुकुट डोक्यावर मिरवण्याचा प्रवास मान्यासाठी कमालीचा अवघड आणि थकवणारा होता. मान्या मंगळवारी मुंबईत एका सत्कार सोहळ्यासाठी आली. ठाकूर कॉलेजच्या (Thakur collage) या सोहळ्यात तिच्या आई-वडिलांनाही सन्मानित केलं गेलं. कुणीही कल्पना करेल, की ती एखाद्या आलिशान गाडीतून तिथं उतरली असेल. मात्र या सोहळ्याला मान्या आली ती वडिलांच्या रिक्षातूनच. वडील रिक्षा चालवत होते आणि मान्या आईसोबत मागं बसली होती. उतरल्यावर तिनं आईच्या पायाशी वाकत वडिलांनाही मिठीत घेतलं. अत्यांत भावुक झालेल्या या तिघांभोवती कॅमेरे लखलखत होते.

जाहिरात

मान्याच्या यशानंतर तिच्या वडिलांनी एक ऑटो रॅली काढली. या रॅलीचं नेतृत्व तिच्या वडिलांनीच केलं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (photos viral on social media) झाले. यात मान्या तिच्या आई-वडिलांसह दिसते आहे. मान्यानं ऑटोत बसून भारताचा ध्वजही (Tiranga) हातात घेतला होता. हेही वाचा 3 महिन्यांपूर्वी तिने सुरू केलं ऑलनाइन Organic Store, महिन्याला कमावते 1 लाख मान्याचे वडील साधे रिक्षा ड्रायव्हर आहेत. आई गृहिणी. घराची परिस्थिती खूपच बेताची. अनेकदा हे कुटुंब काही न खाता-पिता झोपलेलं आहे. मात्र मान्यानं परिस्थितीपुढं कधीच गुडघे टेकले नाहीत. तिनं सतत संघर्ष केला. परिस्थितीमुळं ती जास्त शिक्षण घेऊ शकली नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी तिनं घर सोडलं. मिस इंडिया स्पर्धेत भाग घ्यायचा हे तेव्हाच ठरवलं होतं. भांडी घासणं, कॉल सेंटरची नोकरी (job at call center) आणि पडेल ते काम करत तिनं मुंबईत पाय रोवले. आजच्या या दिमाखदार यशाचं श्रेय ती आई-वडिलांना देते. कष्ट आणि श्रमाचं मोल वडिलांकडून शिकल्याचं ती सांगते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात