• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • EXPLAINER: अमेरिकेत तिसऱ्या महत्त्वाच्या पदी भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता; का आहे ही निवड ऐतिहासिक?

EXPLAINER: अमेरिकेत तिसऱ्या महत्त्वाच्या पदी भारतीय वंशाच्या वनिता गुप्ता; का आहे ही निवड ऐतिहासिक?

कोण आहेत वनिता गुप्ता? (Vanita Gupta first Indian American Associate Attorney General) अमेरिकेच्या असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल म्हणून त्यांची निवड ऐतिहासिक का मानली जात आहे?

  • Share this:
वॉशिंग्टन, 22 एप्रिल: भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक (Indo-American Citizen) वनिता गुप्ता (Vanita Gupta Associate Attorney General) यांची अमेरिकेच्या असोसिएट अ‍ॅटर्नी जनरल (Associate Attorney General) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, आज अमेरिकी सिनेटनं (US Senate) त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकी महिला आहेत. वनिता गुप्ता यांनी एक इतिहास घडवला आहे. तमाम भारतीयांसाठी अभिमान वाटावी अशी ही घटना आहे. अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेतील हे तिसरं सर्वोच्च मानाचं पद आहे. वनिता गुप्ता यांना सिनेटमध्ये 51 मतं मिळाली. रिपब्लिकन पक्षाच्या लिसा मुर्कोस्की यांनीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या (Democratic Party) उमेदवार असलेल्या वनिता गुप्ता यांना मत दिलं. बरोबरीत मतं पडल्यास निर्णायक मत देण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस (Vice President Kamala Harris) उपस्थित होत्या. दोन्ही पक्षाचे प्रत्येकी 50 या प्रमाणे 100 सदस्य असलेल्या सिनेटमध्ये 51 विरुद्ध 49 अशा मतांनी वनिता गुप्ता यांचा विजय झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांने वनिता गुप्ता यांचे अभिनंदन केलं आहे. आता सिनेटनं क्रिस्टीन क्लर्क यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेसाठी दोन अत्यंत योग्य आणि मान्यताप्राप्त वकीलांची नावं सुचवली असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीत जातीय समानता आणि न्यायाला प्राधान्य दिलं आहे, असं बायडेन यांनी म्हटलं आहे. सिनेटमधील वरिष्ठ सदस्य चक शुमर यांनी वनिता गुप्ता यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले, वनिता गुप्ता या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्यांची या पदावर निवड झाली आहे. त्या अमेरिकी न्याय व्यवस्थेला अपेक्षित नवा दृष्टीकोन देतील असा विश्वास शुमर यांनी व्यक्त केला. कोण आहेत वनिता गुप्ता? भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या फिलाडेल्फिया (Philadelphia) भागात स्थिरावलेल्या भारतीय कुटुंबात वनिता गुप्ता यांचा जन्म झाला असून, वकील म्हणून काम करत असताना त्यांनी कायम नागरी हक्कांसाठी लढा दिला आहे. त्यांच्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलं आहे. येल युनिवर्सिटीतून कला शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून कायदा विषयात डॉक्टरेट मिळवली. वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी एनएएसीपी डिफेन्स फंडमधून कारकिर्दीला सुरुवात केली. चुकीचे आरोप ठेवून अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवलेल्या टेक्सासमधील ट्युलीया इथल्या 38 कृष्णवर्णीयांना त्यांनी यशस्वीरीत्या सोडवलं. अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियनमध्ये त्यांनी स्थलांतरित आणि बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडणाऱ्या (आयसीई) लोकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाई विरुद्ध आवाज उठवला. यामुळे स्थलांतरितांना सरसकट तुरुंगात डांबणे आणि कुटुंबांना नजरकैदेत ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसला. 2014 ते 2017 या कालावधीत वनिता गुप्ता यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत नागरी हक्क विभागाच्या असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिलं. त्यावेळी त्यांनी गुन्हेगारी कायद्यात सुधारणा केल्या. द्वेषमूलक गुन्ह्यांसाठी न्यायाच्या बाजूनं लढा दिला. मतदानाचा हक्क आणि विषमतेविरुद्ध आवाज उठवला. कमला हॅरिस यांच्या शपथविधीला पतीची पहिली पत्नी मुलांसह हजर; निखळ नात्याचं कौतुक वनिता गुप्त यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय-अमेरिकन समूहानं त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. ‘वनिता गुप्ता या अशा एका भारतीयाच्या कन्या आहेत, जे फक्त खिशात आठ डॉलर्स आणि एक स्वप्न घेऊन भारतातून अमेरिकेत आले होते. वनिता गुप्ता देशातील एक आघाडीच्या नागरी हक्क वकील असून, असोसिएट अॅटर्नी जनरल म्हणून त्या न्यायव्यवस्थेत उच्च आदर्श निर्माण करतील,’ अशी प्रतिक्रिया भारतीय अमेरिकन सल्लागार समूह ‘इम्पॅक्ट’चे कार्यकारी संचालक नील मखीजा यांनी व्यक्त केली आहे. ‘आम्हाला वनिता गुप्ता यांचा अतिशय अभिमान असून, अमेरिकन नागरिक तसेच अल्पसंख्याक असलेल्या समाजासाठी त्या एक मोठा आदर्श आहेत. सध्या अमेरिकेत अन्य वर्णीय लोकांबाबतच्या द्वेषातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, आमच्या मतदानाच्या अधिकारावरही गदा आणली जात आहे. अशावेळी नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या वनिता गुप्ता यांच्य्यासारख्या व्यक्तीची न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पदी निवड होणं ही फार महत्त्वाचं आहे,’ असंही मखीजा यांनी म्हटलं आहे. हवामान बदलाबाबत आत्ताच कृती करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील दि लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अँड ह्यूमन राईटस संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेड हेंडरसन म्हणाले की, गुप्ता यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत देशातील प्रत्येक व्यक्तीच्या नागरी हक्कांसाठी, विशेषत: दुर्लक्षित समाजातील लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला असून, त्यात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात केली आहे. अशा लढवैय्या वृत्तीच्या वनिता गुप्ता यांनी इतिहास घडवला आहे यात फार मोठे आश्चर्य नाही. प्रथमच असोसिएट अॅटर्नी जनरलपदी नागरी हक्क वकील आणि अश्वेतवर्णीय महिलेची नियुक्ती झाली आहे. न्याय विभागाची कलंकित झालेले प्रतिमा सुधारण्यासाठी आणि आमच्या नागरी हक्कांच्या मुख्य संरक्षक पदाची प्रतिमा उजळण्यासाठी अ‍ॅटर्नी जनरल गारलँड यांच्यासोबत त्यांनी ताबडतोब काम करायला सुरुवात केली पाहिजे.’ इस्रायलनं Mask वरील निर्बंध उठवले, पहिल्यासारखं सुरु झालं सर्वांचं आयुष्य हेंडरसन पुढं म्हणाले, ‘देश सध्या एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्प्यातून जात असून, एकाच वेळी आपण लोकशाहीची पुनर्बांधणी आणि बचाव करत आहोत. ‘न्याय विभागाचे नेतृत्व करण्यासाठी आणि सर्वांना समान न्याय मिळवून देण्यासाठी नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या वनिता गुप्ता अत्यंत योग्य व्यक्ती आहे,’ असं मत नागरी हक्क वकील समितीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डेमन हेविट यांनी व्यक्त केलं. ‘न्याय विभागामध्ये स्वातंत्र्य आणि अखंडता परत आणण्याची गरज असण्याच्या काळात लोकांच्या हक्कांसाठी वकिली आणि व्यवस्थापन कौशल्यअसलेल्या व्यक्तीची आवश्यकता आहे, त्यासाठी ती अत्यंत पात्र व्यक्ती आहे,’असंही हेविट यांनी नमूद केलं.
First published: