मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /जगात भारी! इस्रायलनं Mask वरील निर्बंध उठवले, पहिल्यासारखं सुरु झालं सर्वांचं आयुष्य

जगात भारी! इस्रायलनं Mask वरील निर्बंध उठवले, पहिल्यासारखं सुरु झालं सर्वांचं आयुष्य

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा जग आटोकाट प्रयत्न करत असताना पश्चिम आशियातील (West Asia) इस्रायल (Israel) या देशानं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्बंध उठवले आहेत.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा जग आटोकाट प्रयत्न करत असताना पश्चिम आशियातील (West Asia) इस्रायल (Israel) या देशानं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्बंध उठवले आहेत.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा जग आटोकाट प्रयत्न करत असताना पश्चिम आशियातील (West Asia) इस्रायल (Israel) या देशानं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्बंध उठवले आहेत.

मुंबई, 19 एप्रिल : संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करत आहे. भारतामध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क (Mask) वापरणं आवश्यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांचं प्रबोधन करण्यात येत असून नियम मोडणाऱ्यांवर दंड आकारण्यात येत आहे. ब्राझील सरकारनं तर महिलांनी या काळात गर्भवती राहू नये अशी सूचना केली आहे.

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याचा जग आटोकाट प्रयत्न करत असताना पश्चिम आशियातील (West Asia) इस्रायल (Israel) या देशानं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्बंध उठवले आहेत. देशातील 80 टक्के नागरिकांना कोरोना लस (Corona vaccination) दिल्यानंतर इस्रायल सरकारनं रविवारी हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाकडे इस्रायलनं कोरोना  व्हायरसवर मिळवलेला विजय म्हणून पाहिलं जात आहे.

तीन महिन्यांत बदललं चित्र

93 लाख लोकसंख्येच्या इस्रायलमध्ये गेल्या वर्षभरापासून नागरिकांना कोरोनामुळे कठोर निर्बंध सहन करावे लागत होते. या देशात गेल्या वर्षभरात 8,36,000 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 6,331 जणांचा यामध्ये मृत्यू झाला.  जानेवारी महिन्यातही कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 10 हजारांच्या घरात होती. त्यानंतर इस्रायल सरकारनं अत्यंत आक्रमकपणे लसीकरण अभियान राबवले. त्यामुळे कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली.

हा अतिशय वेगळा पण खूप चांगला अनुभव असल्याचं मत जेरुसलेममधील एका 26 वर्षांच्या तरुणीनं व्यक्त केलं आहे. तिनं शहरातील बस स्टँडवर मास्क काढत हा आनंद साजरा केला. "माझ्या लग्नाला आता दोन आठवडे उरले आहेत.'' त्यामुळे हा अगदी योग्य वेळी निर्णय जाहीर झाला आहे. आता आनंदाच्या या प्रसंगात आम्हाला कुणालाही मास्कनं चेहरा झाकण्याची गरज नाही," या शब्दात तिनं तिचा आनंद व्यक्त केला आहे.

इस्रायल सरकारनं शिक्षण संस्था पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शाळेतील मैदानातही विद्यार्थ्यांना मास्क न लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

'या' देशानं महिलांना दिला गर्भवती न होण्याचा सल्ला, समोर आलं धक्कादायक कारण

काही निर्बंध अजूनही कायम

इस्रायल सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यावरील निर्बंध उठवले असले तरी बंदिस्त ठिकाणी तसंच मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात मास्क वापरणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये येणाऱ्या विदेशी नागरिकांवरही पूर्वीसारखेच कडक निर्बंध कायम आहेत.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Israel, Mask, Precaution, Sanitizer