Home /News /videsh /

अमेरिकेला वाटतेय रशियाच्या घुसखोरीची भीती, युक्रेनपाठोपाठ आता युरोपातही धाडणार सैन्य

अमेरिकेला वाटतेय रशियाच्या घुसखोरीची भीती, युक्रेनपाठोपाठ आता युरोपातही धाडणार सैन्य

अमेरिकेनं आता युरोपीय देशांमध्ये आपलं सैन्य पाठवायला सुुरुवात केली आहे. यामुळे युक्रेन प्रश्नावरून रशियासोबत सुरू असणाऱ्या संघर्षातील तणाव आणखी वाढला आहे.

    वॉशिंग्टन, 2 फेब्रुवारी: अमेरिका (America) आणि रशिया (Russia) या दोन्ही देशांना एकमेकांकडून होणाऱ्या अतिक्रमणाची (Invasion) भीती वाटत असल्याचं दिसून आलं आहे. युक्रेन प्रश्नावरून आमनेसामने आलेल्या या दोन्ही देशांनी आता शक्य त्या सर्व आघाड्यांवर आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून अमेरिेकने युरोपातील काही देशांमध्ये (European countires) आपलं सैन्य (Troops) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः युक्रेनच्या जवळ असणाऱ्या देशांत सैन्याची ताकद वाढवण्यासाठी अमेरिेकनं पावलं उचलली आहेत.  युरोपात धाडणार सैन्य युरोपातील पोलंड, जर्मनी आणि रोमानिया या देशांमध्ये आपलं सैन्य तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. पोलंड आणि जर्मनीत अमेरिेकेचे 2000 सैनिक पाठवले जातील तर सध्या जर्मनीत असणारे 1000 सैनिक हे रोमानियाला पाठवले जाणार आहेत.  रशियाची ब्रिटनवर टीका रशियानं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सतत धोरणं बदलत राहणारा आणि गोंधळलेला पंतप्रधान असं वर्णन रशियानं केलं आहे. तर अमेरिकेचा सैन्यबळ तैनात करण्याचा निर्णय वेडेपणाचा असून निरर्थक असल्याची टीकाही रशियानं केली आहे.  रशिया आक्रमक रशियाने युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेलं 1 लाखांचं सैन्य मात्र अद्यापही हलवलेलं नाही. रशियाने जर युक्रेनवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर चोख उत्तर दिलं जाईल, असा इशारा अमेरिका आणि नाटोनं दिला आहे. अमेरिेकनं दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनमध्ये मोठा शस्त्रसाठाही पाठवला आहे. मात्र रशियाने युक्रेनचा ताबा घेतला, तर युरोपीय देशांवर आक्रमण होण्याची शक्यता गृहित धरून अमेरिकेनं युक्रेनला लागून असणाऱ्या युरोपीय देशांमध्ये आपलं सैन्य तैनात करायला सुरुवात केली आहे.  हे वाचा - काय आहे प्रकरण? युक्रेनचा नाटो संघटनेत समावेश कऱण्याच्या हालचाली युरोपीय देशांनी सुरू केल्या आहेत. मात्र याला रशियानं तीव्र आक्षेप घेतला असून जर युक्रेनचा नाटोत समावेश झाला, तर गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागेल, असा इशारा दिला आहे. युरोपीय देश युक्रेनच्या मार्गे रशियावर आक्रमण करू पाहत असल्याची भूमिका रशियाची आहे. तर रशिया युक्रेनवर आक्रमण करून युरोपीय देशांवर अतिक्रमण करू पाहत असल्याचं युरोपीय देशांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तणाव निर्माण झाला आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Germany, Russia, War

    पुढील बातम्या