लंडन, 2 फेब्रुवारी: विमान (Airplane) लँड (Landing) करत असताना वाऱ्याच्या वेगवान झोतामुळे (Heavy Wind) ते एका बाजूला कललं (Tossed) आणि मोठा अपघात (Accident) होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र विमानाच्या पायलटने प्रसंगावधान (Presence of mind) राखत विमान पुन्हा हवेत उडवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. विमानाच्या लँडिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध झाला असून किती थरारक प्रकार घडला, याची कल्पना हा व्हिडिओ पाहून येऊ शकते. असं झालं लँडिंग नेहमीप्रमाणे ब्रिटीश एअरवेजचं विमान हेथ्रो विमानतळावर लँड होत होतं. विमानाच्या लँडिंगसाठी सर्व आवश्यक ते सिग्नल मिळाले आणि पायलटनं लँडिंग प्रक्रियेला सुरुवात केली. नेहमीच्या सराईत पद्धतीनं वैमानिक ते विमान जमिनीपाशी घेऊन आला. विमानाचा वेग कमी होत गेला आणि ते वेगाने जमिनीच्या जवळ पोहोचलं. आता कुठल्याही क्षणी विमानाची चाकं जमिनीला स्पर्श करणार आणि मग विमानाचे ब्रेक लागून सेफ लँडिंग होणार, असंच वाटत होतं. मात्र तेवढ्यात एक विचित्र प्रकार घडला.
A321 TOGA and Tail Strike!
— BIG JET TV (@BigJetTVLIVE) January 31, 2022
A full-on Touch and go, with a tail strike! Watch for the paint dust after contact and watch the empennage shaking as it drags. The pilot deserves a medal! BA training could use this in a scenario - happy to send the footage chaps 😉#aviation #AvGeek pic.twitter.com/ibXjmVJGiT
वाऱ्याने गेला तोल विमानाचं लँडिंग सुरू असतानाच जोरदार वारे वाहत होते. विमान ज्या क्षणी जमिनीला टेकलं, त्या क्षणी जोरदार वाऱ्यामुळे ते एका बाजूला ढकललं गेलं. विमानाच्या उजव्या पंख्याची बाजू वर झाली आणि ते डाव्या बाजूला कलंडेल, असं वाटू लागलं. विमानाचा बॅलन्स जाऊन एक बाजू हवेत उचलली जात असल्याचं लक्षात येताच पायलटनं आपला निर्णय बदलला. विमानाला स्थिर करण्याचा प्रयत्न न करता त्यानं पुन्हा त्याचा वेग वाढवला आणि लँडिंग करता करताच टेकऑफचा निर्णय घेतला. हे वाचा -
विमान पुन्हा हवेत जमिनीवर टेकत असणारं विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावलं आणि काही सेकंदात हवेत स्थिर झालं. मग काही मिनिटांनंतर पुन्हा लँडिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी मात्र नेहमीप्रमाणे या विमानानं सुरक्षित लँडिंग केलं आणि शेकडो प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.