नवी दिल्ली 19 जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) शनिवारी सकाळी डेलावेर राज्यातील समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या घराजवळ सायकल चालवत होते. मात्र ते अचानक सायकलवरून खाली पडले (Joe Biden Falls Off from Cycle). मात्र यातून सावरताच त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आता लोकांची मनं जिंकत आहे.
काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला; प्रार्थनास्थळी दिसले धुराचे लोट, घटनेचा Live Video
व्हाईट हाऊस पूल रिपोर्टमधील एका व्हिडिओमध्ये 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष पडल्यानंतर लगेच उठताना दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शनिवारी त्यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसजवळील केप हेन्लोपेन स्टेट पार्कजवळ सायकलवरून उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. त्यांचं म्हणणं आहे की या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
BBC CNN
Breaking News! Putin sabotaged Biden‘s Bike to make him fall! pic.twitter.com/lmqqjetGc7 — Levi (@Levi_godman) June 18, 2022
घटनेनंतर लगेचच, यूएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी बायडेन यांना उठण्यास मदत केली. काही वेळातच बायडेन यांनी लोकांना सांगितलं की, 'मी ठीक आहे.' ते म्हणाले, 'फक्त माझा पाय अडकला होता.'
अमेरिका पुन्हा गोळीबारानं हादरली, चर्चमध्ये झाला अंधाधुंद गोळीबार
हे उल्लेखनीय आहे की 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन सकाळी सायकलवर फिरण्यासाठी निघाले होते आणि आपल्या शुभचिंतकांना भेटण्यासाठी पुढे जात होते. हेल्मेट घातलेले बायडेन सायकलवरून उतरण्याच्या प्रयत्नात खाली पडले. उजवीकडे पडल्यानंतर, बायडेन ताबडतोब उठून उभा राहिले.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज नाही. राष्ट्राध्यक्ष आपला उर्वरित दिवस कुटुंबासोबत घालवण्यास उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Joe biden, Live video viral