जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अमेरिका पुन्हा गोळीबारानं हादरली, चर्चमध्ये झाला अंधाधुंद गोळीबार

अमेरिका पुन्हा गोळीबारानं हादरली, चर्चमध्ये झाला अंधाधुंद गोळीबार

अमेरिका पुन्हा गोळीबारानं हादरली, चर्चमध्ये झाला अंधाधुंद गोळीबार

अमेरिका गोळीबाराच्या आणखी एका घटनेनं हादरली आहे. आता चर्चमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : अमेरिका गोळीबाराच्या आणखी एका घटनेनं हादरली आहे. अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये (Saint Stephens Episcopal Church गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. न्यज एजन्सी AFP नं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेस्ताविया हिल्स पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी 3775 क्रॉसहेव ड्राइव्ह भागात गोळीबाराची सूचना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. येथील चर्चमधील अनेकांना गोळी लागली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या गोळीबारातील जखमींची नेमकी संख्या पोलिसांनी अद्याप सांगितलेली नाही. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणात अधिक चौकशीनंतर पुढील माहिती देण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 4 महिन्यांत 212 घटना अमेरिकेतील स्वतंत्र डेटा संग्रह करणाऱ्या ‘गन व्हॉयलन्स अर्काइव्ह’च्या रिपोर्टनुसार गेल्या 4 महिन्यात 212 सामूहिक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. 2021 मध्ये 693 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. 2022 मध्ये आत्तापर्यंत 611 ठिकाणी गोळीबार झाला आहे. तर 2019 मध्ये 417 ठिकाणी या प्रकराच्या घटना घडल्या होत्या. श्रीलंकेत अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे परिस्थिती चिघळली, पेट्रोल पंपाच्या रांगेतील रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू अमेरिकेत गेल्या महिन्यात सामूहिक गोळीबाराच्या झालेल्या घटनेनंतर देशातील गन कल्चरवर (Gun Culture in America)  बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात सिनेटमध्ये कायद्यातील बदलाच्या प्रस्तावाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या उपायानुसार 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बंदूक खरेदी करायची असल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच अवैध पद्धतीनं बंदूक खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात