मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चीनच्या समुद्रात अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, 11 जखमी

चीनच्या समुद्रात अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीचा रहस्यमय अपघात, 11 जखमी

दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकन नौदलाची (US Navy) आण्विक पाणबुडीचा अपघात झाला आहे.

दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकन नौदलाची (US Navy) आण्विक पाणबुडीचा अपघात झाला आहे.

दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकन नौदलाची (US Navy) आण्विक पाणबुडीचा अपघात झाला आहे.

वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर: आण्विक पाणबुडीचा (nuclear submarine) अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकन नौदलाची (US Navy) आण्विक पाणबुडीचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे नौदलाला हा मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. तैवान आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा अपघात झाला आहे.

एका अज्ञात रहस्यमय वस्तूला पाणबुडी धडकली आणि हा अपघात झाला. दक्षिण चीन समुद्रात हा अपघात झाला. या अपघातात अमेरिकन नौदलाचे 11 जवान जखमी झालेत. ज्या वेळी पाणबुडीचा अपघात झाला त्यावेळी अमेरिकची पाणबुडी ही आंतरराष्ट्रीय समुद्राच्या सीमेत होती, असं अमेरिकेच्या पॅसिफिक महासागराच्या आरमारानं गुरुवारी सांगितलं.

हेही वाचा- आगीचं रौद्ररुप, कापड्याच्या गोदामाला भीषण आग; 18 गाड्या घटनास्थळी 

या अपघातासंदर्भात अमेरिकन नौदलानं एक संक्षिप्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवदेनात म्हटलं आहे की, युएसएस कनेक्टिकट आण्विक पाणबुडी अपघातानंतर स्थिर आहे. आण्विक संयंत्राचे कोणतंही नुकसान झालं नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आह. मात्र अमेरिकन नौदलानं हा अपघात नेमका कुठं झाली याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र आण्विक पाणबुडीचा अपघात दक्षिण चीन समुद्रात झाला असल्याचं वृत्त USNI न्यूजनं दिलं आहे. दक्षिण चीन समुद्रात झालेल्या या अपघातानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

दक्षिण चीन समुद्रात तैवान आणि इतर देशांवर चीननं गेल्या काही महिन्यांपासून दादागिरी करत आहे. यामुळे अमेरिकन नौदल तैवानच्या मदतीसाठी या भागात आपलं एअरक्राफ्ट कॅरिअर आणि आण्विक पाणबुडी सातत्यानं पाठवत असल्याचं समजतंय.

हेही वाचा- BCCI नं मदत थांबवली तर पाकिस्तान क्रिकेटचं दिवाळं वाजेल! PCB अध्यक्षांची कबुली  

दरम्यान या अपघाताची चौकशी करणार असल्याचं अमेरिकन नौदलानं सांगितलं आहे. अपघात झालेल्या आण्विक पाणबुडीची लांबी 353 फूट आहे. अमेरिकन नौदलात 1988 मध्ये या पाणबुडीचा समावेश करण्यात आला होता.

First published:

Tags: America, China