नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi) आगीची बातमी समोर येत आहे. आज सकाळी 3.45 च्या सुमारास दिल्लीच्या ओखला फेज 2, हरकेश नगरमधील कपड्याच्या गोदामात (Clothes Warehouse) भीषण आग (Massive Fire Broke Out) लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या 18 गाड्या (18 vehicles) घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवानं या आगीत अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही आहे. मात्र दिल्लीकरांना आगीचं रौद्ररुप पाहायला मिळालं.
मिळालेल्या माहितीनुसार, ओखला फेज 2 च्या कापड्याच्या गोदामात आग लागली आहे. ही आग बेसमेंट आणि पहिल्या मजल्यावर पसरली आहे. आग विझवण्याचे काम सुरूच आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन विभाग आग विझवण्यासाठी शर्थीचं प्रयत्न करत आहे.
Delhi | 17 fire engines are working at the spot, the fire has been brought under control; cooling process underway: SK Dua, Divisional Officer, Delhi Fire Service on fire at fabric godown in Harkesh Nagar, Okhla Phase 2 pic.twitter.com/0r3FOuf6cZ
— ANI (@ANI) October 8, 2021
अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी
दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 3.51 वाजता ओखला फेज -2 च्या संजय कॉलनीमध्ये आग लागल्याचा फोन आला. त्यानंतर घटनास्थळी 18 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.
गेस्ट हाऊसमध्ये आग
यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी पूर्व दिल्लीच्या शकरपूर परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये आग लागली होती. या आगीत तीन जण किरकोळ जखमी झाले होते. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सकाळी 5 च्या सुमारास आगीबाबत कॉल आला, त्यानंतर पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
हेही वाचा- Drug Case: नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट, कोण आहे बड्या BJP नेत्याचा मेहुणा
अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विजेच्या मीटरमध्य आग लागली होती. त्यानंतर ती आग रिसेप्शन, लॉबी आणि गेस्टहाऊसच्या इतर भागांमध्ये पसरली. मात्र, सकाळी सातच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यांनी सांगितलं की, या घटनेत तीन जण किरकोळ भाजले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi latest news, Fire