मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मिसाईल टेस्टनंतर किम जोंगला बायडेन यांचा दणका, दक्षिण कोरिया आणि रशियाचे 5 जण Blacklist मध्ये

मिसाईल टेस्टनंतर किम जोंगला बायडेन यांचा दणका, दक्षिण कोरिया आणि रशियाचे 5 जण Blacklist मध्ये

एकाच आठवड्यात घेतलेल्या सलग दोन मिसाईल टेस्टनंतर उत्तर कोरियावर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही हेच पाऊल उचलावं यासाठी अमेरिका आग्रही आहे.

एकाच आठवड्यात घेतलेल्या सलग दोन मिसाईल टेस्टनंतर उत्तर कोरियावर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही हेच पाऊल उचलावं यासाठी अमेरिका आग्रही आहे.

एकाच आठवड्यात घेतलेल्या सलग दोन मिसाईल टेस्टनंतर उत्तर कोरियावर अमेरिकेनं निर्बंध लादले आहेत. संयुक्त राष्ट्रांनीही हेच पाऊल उचलावं यासाठी अमेरिका आग्रही आहे.

वॉशिंग्टन, 13 जानेवारी: उत्तर कोरियाकडून (North Korea) घेण्यात आलेल्या मिसाईल टेस्टनंतर (Missile Test) अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनानं (Joe Biden Administration) कडक पावलं उचलली असून नवे निर्बंध (New Sanctions) जारी केले आहेत. उत्तर कोरियाने केलेल्या मिसाईल चाचणीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत उत्तर कोरियातील सहा (Six north korean) आणि रशियातील एका (1 Russian) अधिकाऱ्याला ब्लॅकलिस्ट (Blacklist) करण्यात आलं आहे. तर रशियाच्या एका फर्मला या प्रकरणी ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय अमेरिकेनंं घेतला आहे.

रशिया आणि चीनमधून खरेदी

उत्तर कोरियाने लागोपाठ केलेल्या दोन मिसाईल टेस्टसाठीचं साहित्य हे रशिया आणि चीनमधून विकत घेतलं होतं, असा दावा अमेरिकेनं केला आहे. हे अधिकारी आणि व्यापारी यांच्या जोरावरच उत्तर कोरिया मिसाईल टेस्ट करू शकली, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. यांच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यापार आणि व्यवहार करण्यावर अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. जगातील कुठल्याही देशाने त्यांच्यासोबत कुठलाही व्यापार करू नये, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. 

निर्बंधांची दोन उद्दिष्टं

सध्या घालण्यात आलेले निर्बंध हे दुहेरी उद्देशानं असल्याचं अमेरिकेच्या ट्रेझरीनं स्पष्ट केलं आहे. उत्तर कोरियाला अशा प्रकारच्या मिसाईल टेस्टपासून परावृत्त करणे आणि पुन्हा असे प्रकार घडवून आणता येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि दुसरं म्हणजे उत्तर कोरियाच्या मिसाईल परिक्षणासारख्या विघातक कृत्यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कडक कारवाई करणे. 

हे वाचा -

युनायडेट नेशन्सकडे लक्ष

अमेरिकेनं घातलेल्या या निर्बंधांचा युनायटेड नेशन्सनं गांभिर्यानं विचार करावा आणि त्यांनीही असेच निर्बंध जारी करावेत, अशी अपेक्षा अमेरिकेनं व्यक्त केली आहे. अमेरिकेसोबत जर युनायटेड नेशन्सनीही हे निर्बंध घातले, तर उत्तर कोरियाच्या व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेनं अगोदरच उत्तर कोरियावर निर्बंध घातले आहे. त्यांच्या मुकाबला करूनही या देशाने एकाच आठवड्यात दोनदा मिसाईल टेस्ट करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे किम जोंग यांच्या नाड्या आवळण्यासाठी त्यांना ज्या ज्या ठिकाणाहून सहकार्य मिळतं, त्यावर निर्बंध घालण्याची भूमिका बायडेन प्रशासनाने घेतली आहे. युनायडेट नेशन्सनेही असेच निर्बंध घातले, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकेल, असा अमेरिकेचा अंदाज आहे.

First published:
top videos

    Tags: America, Ballistic missiles, North korea, Russia