US Election 2020 : निवडणुकीदरम्यान राडा! 24 वर्षीय तरुणी पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर थुंकली, VIDEO VIRAL

US Election 2020 : निवडणुकीदरम्यान राडा! 24 वर्षीय तरुणी पोलिसांना शिवीगाळ करत अंगावर थुंकली, VIDEO VIRAL

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, 06 नोव्हेंबर : संपूर्ण जगाच्या नजरा सध्या अमेरिकत (US Election 2020 ) सुरू असलेल्या निवडणुकांवर आहे. अजून 5 राज्यांचा निकाल अद्यापही लागणं बाकी आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. ट्रम्प यांना विरोध करणाऱ्या एका तरणीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्या चेहऱ्यांवर

ही घटना न्यूयॉर्कमध्ये घडली. या तरुणीचे नाव देवीना सिंह असून ती 24 वर्षांची आहे. घटनेच्या वेळी तिने मास्कही घातला नव्हता. व्हायरल व्हिडिओमध्ये ती पोलीस कर्मचाऱ्यावर ओरडताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी देवीनाला जमिनीवर पाडून अटक केली.

वाचा-कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? 12 नोव्हेंबपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

पोलिसांनी सांगितले की, निदर्शकांनी शांततापूर्ण मार्गाने आंदोलम सुरू केले होते आणि ट्रम्प यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांकडे अशी विनंती केली होती की प्रत्येक मतं मोजावीत. दिवसभरात शांततेत सुरू असलेले आंदोलन रात्री उग्र झाले. निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केलसी. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलनकर्त्यांना अटक केली.

वाचा-US Election 2020: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना किती मिळतो पगार?

याआधी, न्यूयॉर्क पोलीस विभाग प्रमुख म्हणाले की, जर हिंसा आणि लूटमार झाली तर मॅनहॅटनचे काही भाग पूर्णपणे बंद केला जाईल. याशिवाय शेकडो अधिकारीही अशा ठिकाणी तैनात केले आहेत जिथे सामान्यत: निदर्शकं जमतात.

वाचा-US Election: अमेरिकन अध्यक्षाकडे खरंच किती ताकद असते?

12 नोव्हेंबरला कळणार कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजूनही 5 राज्यांची मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो असा कयास आहे. अमेरिकेत एकूण 50 राज्यांपैकी 45 राज्यांचा निकाल आला आहे. तर पेन्सिलवेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिन या उर्वरित 5 राज्यांची मतमोजणी 6, 9 आणि 12 नोव्हेंबरपर्यंत होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीत अफरातफर झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि न्यायालयात धाव घेतली त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. जर ट्रम्प यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर त्याचा निकाल 12 नोव्हेंबरला अधिकृतपणे येईल असा कयास आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: November 6, 2020, 9:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading