US Election 2020 : कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? आज-उद्या नाही 12 नोव्हेंबपर्यंत अंतिम निकालासाठी वाट पाहावी लागणार

US Election 2020 : कोण होणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष? आज-उद्या नाही 12 नोव्हेंबपर्यंत अंतिम निकालासाठी वाट पाहावी लागणार

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या मतमोजणीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. तर अजून 5 राज्यांचा निकाल अद्यापही लागणं बाकी आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 06 नोव्हेंबर : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या मतमोजणीचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. तर अजून 5 राज्यांचा निकाल अद्यापही लागणं बाकी आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना अजून बरीच मजल गाठावी लागणार आहे. या दोघांमध्ये काँटे की टक्कर असल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष अंतिम निकालाकडे लागलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजूनही 5 राज्यांची मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल 12 नोव्हेंबरपर्यंत लागू शकतो असा कयास आहे. अमेरिकेत एकूण 50 राज्यांपैकी 45 राज्यांचा निकाल आला आहे. तर पेन्सिलवेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिन या उर्वरित 5 राज्यांची मतमोजणी 6, 9 आणि 12 नोव्हेंबरपर्यंत होईल असं सांगण्यात येत आहे. मतमोजणीत अफरातफर झाल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि न्यायालयात धाव घेतली त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. जर ट्रम्प यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर त्याचा निकाल 12 नोव्हेंबरला अधिकृतपणे येईल असा कयास आहे.

ट्रम्प यांच्या टीमने फिलाडेल्फियाच्या निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध नवीन दावा दाखल केला आहे. फेडरल कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत राज्य कायद्याविरूद्ध घटनात्मक उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमेरिकन वेळेनुसार या खटल्यावर 5 वाजता सुनावणी होणार आहे.

हे वाचा-बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यास Pak-US संबंध सुधारणार? भारताला राहावं लागेल अलर्ट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US Election result) डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) आता बहुमतापासून काही अंतरावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनात अडचणीत असलेल्या पाकिस्तानासाठी (Pakistan) बायडन यांचं यश खूप महत्त्वपूर्ण आहे. बायडन हे जुने पाकिस्तान समर्थक असल्याचे मानले जाते. बायडन यांना 2008 मध्ये पाकिस्तातील दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान 'हिलाल-ए-पाकिस्‍तान' देण्यात आला आहे. बायडन हे त्या ठराविक अमेरिकन नेत्यांपैकी आहेत जे पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याचं समर्थन करते.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 7:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading