जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / H-1B व्हिसाबाबत बायडन घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचा होणार फायदा

H-1B व्हिसाबाबत बायडन घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचा होणार फायदा

H-1B व्हिसाबाबत बायडन घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचा होणार फायदा

बायडन कॅम्पेन डॉक्युमेंटनुसार (Biden Policy Document), अमेरिकेत राहणाऱ्या लोकांकडून High-Skilled Visa तात्पुरता घेतला जाऊ नये.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन (Joe Biden) यांची निवड एच -1 बी (H-1B Visa) व्हिसाधारकांसाठी चांगली बातमी असू शकते. खरं तर, बायडन अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांसह High-Skilled Visa संख्या वाढविण्याची योजना आखत आहे. जर बायडन प्रशासनाने असे पाऊल उचलले तर अमेरिकेतील हजारो भारतीय व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकेल. कमला हॅरिस (kamala harris) अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली असल्यानं आता H-1B व्हिसाधारकांच्या जोडीदारास वर्क परमिटबाबत ट्रम्प प्रशासनानं घेतलेला निर्णय बदलला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाच्या बंदीनंतर अमेरिकेत वास्तव्य करणारे मोठ्या संख्येने भारतीय कुटुंब त्रस्त झाले होते. या सर्व योजना बायडन प्रशासनाच्या इमिग्रेशन रिफॉर्मचा भाग असेल. हे सर्व निर्णय एकत्रित घेतले जातील की एक-एक करून निर्णय घेण्यात येईल, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बायडन कॅम्पेन डॉक्युमेंटनुसार (Biden Policy Document), अमेरिकेत राहणाऱ्या लोकांकडून High-Skilled Visa तात्पुरता घेतला जाऊ नये. जर इमिग्रेशन सिस्टम एंट्री लेव्हल कामगारांना प्रोत्साहन देत असेल तर याच्यामुळे अमेरिकेच्या इनोव्हेशनला धक्का पोहचेल. वाचा- इथं जो बायडन झाले राष्ट्राध्यक्ष, तिकडे ट्रम्प पाहा काय करत होते; VIDEO VIRAL भारत आणि चीनमधील व्यावसायिकांना होणार फायदा H-1B व्हिसामुळे अमेरिकेतील High-Skilled कामगारांची संख्या वाढविण्यात मदत होते. H-1B व्हिसा हा एक नॉन-इमिग्रेंट व्हिसा आहे. याच्यामुळे अमेरिकेतील कंपन्या विदेशी कामगारांना नियुक्त करते. दर वर्षी या अमेरिकन कंपन्या भारत आणि चीनमधील हजारो लोकांना रोजगार देतात. वाचा- ‘मी पहिली उपराष्ट्राध्यक्ष, अखेरची नाही’, कमला हॅरिस यांनी जनतेला केलं संबोधित ग्रीन कार्ड व्हिसा मर्यादा वाढू शकते रोजगार आधारित व्हिसाला ग्रीन कार्ड म्हणतात. याच्या मदतीने अमेरिकेत स्थलांतरितांना कायदेशीररित्या कायमचे नागरिकत्व मिळते. सध्या अस्तित्त्वात असलेले रोजगार आधारित व्हिसा वर्षाकाठी 1,40,000 इतके आहे. बायडन यांच्या धोरणात्मक कागदपत्रात असे म्हटले आहे की, ही संख्या कॉंग्रेससोबत मिळून वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात