मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'मी पहिली उपराष्ट्राध्यक्ष, पण अखेरची नाही', विजयानंतर पहिल्यांदाच कमला हॅरिस यांनी जनतेला केलं संबोधित

'मी पहिली उपराष्ट्राध्यक्ष, पण अखेरची नाही', विजयानंतर पहिल्यांदाच कमला हॅरिस यांनी जनतेला केलं संबोधित

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून  येत इतिहास रचला.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येत इतिहास रचला.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येत इतिहास रचला.

वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा दारूण पराभव केला. बायडन यांना 284 इलेक्ट्रोल मतं मिळाली असून अमेरिकेचा 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर जो बायडेन यांच्याबरोबर अमेरिकेच्या इतिहासात पहिल्या कृष्णवर्णीय, महिला आणि त्यातही भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येत इतिहास रचला. विजयानंतर जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी कमला यांनी, "मी अमेरिकेची पहिली उपराष्ट्राध्यक्ष असेन, पण अखेरची नाही'. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारता आली आहे.

विजयानंतर जनतेला संबोधित करताना कमला हॅरिस म्हणाल्या की, "अमेरिकेसाठी तुम्ही एका नवीन दिवसांची सुरुवात केली. या निवडणुकीत जेव्हा आपली लोकशाही बॅलेट बॉक्समध्ये बंद होती, तेव्हा अमेरिकेची आत्मा पणला लागली होती. संपूर्ण जगाचं आपल्याकडे लक्ष होतं. तेव्हा अमेरिकेनं एका नव्या दिवसाची सुरुवात केली". कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. श्यामला गोपालन मूळच्या भारतीय आहेत, तर वडील डोनाल्ड हॅरिस आफ्रिकेतून स्थलांतरित झाले आहेत.

वाचा-भारतातील 'या' गावात साजरा केला जातोय कमला हॅरिस यांचा विजय, पाहा PHOTOS

कमला हॅरिस यावेळी असंही म्हणाल्या की, मला माहित आहे, मागील काळ तुमच्यासाठी खूपच कठीण होता. मागील काही महिने आपल्यासाठी अत्यंत वेदनादायक आणि दु:खी होते. पण तुम्ही धैर्य आणि चिकाटी दाखवली. कमला म्हणाल्या की, येणारी चार वर्षे आपण न्याय, समानता आणि जीवनात मोठे बदल यांच्यासाठी मत दिले आहे. या मतदानाद्वारे तुम्ही आशा, ऐक्य, शालीनता, विज्ञान आणि सत्य निवडले आहे. आपण अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांनी निवड केली आहे.

वाचा-We did it Joe! कमला हॅरिस यांना आवरले नाहीत अश्रू अध्यक्षांना बातमी कशी दिली?

राष्ट्राध्यक्षपदासाठी दिलं होतं आव्हान

कॅलिफोर्नियाच्या खासदार असलेल्या Kamala Harris यांनी एकदा जो बायडन यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, पुढे त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या होत्या. वर्षांच्या कमला डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या. कॅलिफोर्नियातील ऑकलँडमध्ये त्यांचा झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. कमला हॅरिस निष्णात वकील आहेत.

First published:

Tags: US elections