• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • US Election 2020: निकालाआधी ट्रम्प यांच्या मुलाचे प्रताप, जगाचा नकाशा शेअर करत काश्मीर दाखवला पाकिस्तानात

US Election 2020: निकालाआधी ट्रम्प यांच्या मुलाचे प्रताप, जगाचा नकाशा शेअर करत काश्मीर दाखवला पाकिस्तानात

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर वादग्रस्त नकाशा पोस्ट केली आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : अमेरिकेमध्ये नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदासाठी (US President Election 2020) निवडणुका पार पडल्या आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र त्याआधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा मुलगा डोनाल्ड ज्युनिअर ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर वादग्रस्त नकाशा पोस्ट केला आहे.  ट्रम्प ज्युनिअर यांनी जो बायडन (joe biden) आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक देशांना जगाच्या नकाशावर लाल आणि निळ्या रंगात विभागले. या नकाशामध्ये, भारत त्याच्या वडिलांचा प्रतिस्पर्धी उमेदवार बायडन यांचा समर्थक असल्याचे म्हटले जाते. मुख्य म्हणजे या नकाशामध्ये काश्मीरला पाकिस्तानचा भाग म्हणून दर्शविले गेले आहे तर ईशान्य भारतही भारताचा भाग नसल्याचे दाखवले आहे. डोनाल्ड ज्युनिअर यांनी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानादरम्यान हा नकाशा ट्विट केला आहे. यामध्ये ट्रम्प यांना पाठिंबा देणारे देश लाल रंगात आणि बायडन यांचे समर्थक निळ्या रंगात दाखवले आहेत. नकाशावर पाकिस्तान आणि रशियाचे वर्णन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक म्हणून केले गेले आहे, तर भारत बायडन यांचे समर्थक असल्याचे दाखवले आहेत. भारतशिवाय चीन, मेक्सिको आणि लाइबेरिया देखील बायडन समर्थक असल्याचे म्हटले आहे. वाचा-बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत,वाचा पहिल्या टप्प्यात कोणाची बाजी डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या आधी ट्रम्प यांनी भारताविरोधात निवेदन दिले आहे. ट्रम्प यांनी बायडन यांच्यासमवेत अध्यक्षीय चर्चेत पर्यावरणाच्या विषयावर भारतावर निशाणा साधला. चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी हवामान बदलासाठी भारताला कारणीभूत ठरवत भारताची हवा घाणेरडी असल्याचे म्हटले होते. वाचा-ट्रम्प यांच्यापुढे विजयासाठी आहे एकमेव मार्ग; US Election मधले कळीचे 5 मुद्दे सोशल मीडियावर या नकाशावर टीका केली जात आहे. कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनीही डोनाल्ड ज्युनिअर यांच्यावर टीका केली आहे. शशी थरूर यांनी ट्वीट केले की, "नमोची ब्रोमन्सची किंमत: काश्मीर आणि ईशान्य भारताच्या इतर भागातून काढून टाका." दुसरीकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध बायडन यांच्यात अटीतटीचा सामना आहे. नुकतंच जॉर्जियासह 6 राज्यांचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी तीन राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला विजय मिळवण्यात यश आलं आहे. ट्रम्प की बायडन कोण जिंकणार? प्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्यात काँटे की टक्कर आहे. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या वृत्तानुसार इंडियाना इथे ट्रम्प यांना 65.7 टक्के मत मिळाली आहेत तर बायडन यांना 32.6 टक्के मतं मिळवली आहेत. हॅम्पशायर इथे डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी आहे. रिपब्लिकन पक्षचा ऐतिहासिक विजय होईल आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी शपत घेईन असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी रॅलीदरम्यान व्यक्त केला होता. ट्रम्प आणि बायडन यांच्यात सध्या चुरशीची लढत होत असून अंतिम निकाल हाती येणं अद्याप बाकी आहे. संपूर्ण जगाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: