• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • US Election : बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत, वाचा पहिल्या टप्प्यात कोण आहे पुढे

US Election : बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत, वाचा पहिल्या टप्प्यात कोण आहे पुढे

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अलबामा, मिसिसिप्पी, ऑक्लाहोमा आणि टेनेसी या भागांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : अमेरिकेमध्ये नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडल्या आहेत. याची मतमोजणी उशिरा सुरू झाली असून हळूहळू निकाल हाती येऊ लागले आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध बायडन यांच्यात अटीतटीचा सामना आहे. नुकतंच जॉर्जियासह 6 राज्यांचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी तीन राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला विजय मिळवण्यात यश आलं आहे. अमेरिकेत 45 व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपले आहे. मतमोजणी सुरू असून लवकरच संपूर्ण निकाल हाती येऊ शकतो. सध्याची स्थिती पाहता बायडन आघाडीवर आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 3 राज्यांमध्ये जास्त माताधिक्य मिळालं आहे. जर ट्रम्प पुन्हा विजयी झाले तर सलग दोनदा राष्ट्राध्यक्षपदाची शपत घेणारे चौथे अध्यक्ष असतील. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अलबामा, मिसिसिप्पी, ऑक्लाहोमा आणि टेनेसी या भागांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेर, इलिनॉय, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी रोड आयलँड या भागांमध्ये विजय मिळवला आहे. आतापर्यंत 7 राज्यांच्या मतमोजणीमध्ये बायडन आघाडीवर आहेत. हे वाचा-ट्रम्प यांच्यापुढे विजयासाठी आहे एकमेव मार्ग; US Election मधले कळीचे 5 मुद्दे प्लोरिडामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्यात काँटे की टक्कर आहे. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या वृत्तानुसार इंडियाना इथे ट्रम्प यांना 65.7 टक्के मत मिळाली आहेत तर बायडन यांना 32.6 टक्के मतं मिळवली आहेत. हॅम्पशायर इथे डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी आहे. रिपब्लिकन पक्षचा ऐतिहासिक विजय होईल आणि पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी शपत घेईन असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी रॅलीदरम्यान व्यक्त केला होता. ट्रम्प आणि बायडन यांच्यात सध्या चुरशीची लढत होत असून अंतिम निकाल हाती येणं अद्याप बाकी आहे. संपूर्ण जगाचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published: