मराठी बातम्या /बातम्या /देश /

US Election 2020 : जो बायडन- कमला हॅरिस यांच्याबरोबर संबंध वाढवण्यासाठी मोदींचा काय आहे प्लॅन?

US Election 2020 : जो बायडन- कमला हॅरिस यांच्याबरोबर संबंध वाढवण्यासाठी मोदींचा काय आहे प्लॅन?

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक (US Election 2020) जो बायडेन यांनी जिंकली तर अमेरिकेबरोबरच्या मैत्रीचा पुढचा अध्याय कसा लिहायचा याबाबत मोदींची तयारी सुरू झाली आहे. भारतीय वंशाचे 2 चेहरे या कामी मोलाचे ठरतील तर एक थोडा अडचणीचा...

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक (US Election 2020) जो बायडेन यांनी जिंकली तर अमेरिकेबरोबरच्या मैत्रीचा पुढचा अध्याय कसा लिहायचा याबाबत मोदींची तयारी सुरू झाली आहे. भारतीय वंशाचे 2 चेहरे या कामी मोलाचे ठरतील तर एक थोडा अडचणीचा...

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक (US Election 2020) जो बायडेन यांनी जिंकली तर अमेरिकेबरोबरच्या मैत्रीचा पुढचा अध्याय कसा लिहायचा याबाबत मोदींची तयारी सुरू झाली आहे. भारतीय वंशाचे 2 चेहरे या कामी मोलाचे ठरतील तर एक थोडा अडचणीचा...

    महा सिद्दिकी नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : भारताचे अमेरिकेबरोबरचे (India US relations) संबंध पूर्वीपासूनच मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. ओबामांनंतर (Barack Obama ) ट्रम्प (Donald Trump)यांचं रिपब्लिकन सरकार आलं आणि हे संबंध आणखी दृढ आले. आता पुन्हा एकदा अमेरिकेत जो बायडेन (Joe Biden) यांचं डेमोक्रॅटिक (Democrats) सरकार येण्याच्या मार्गावर आहे. व्हाइट हाउसमध्ये (White House Power Shift) होणाऱ्या बदलांच्या अंदाजाने मोदी सरकारनेसुद्धा (PM Modi) नव्या संबंधांची चाचपणी पूर्वीच सुरू केलेली आहे. अमेरिकेत परिस्थिती बदणार याचा अंदाज आल्याबरोबर भारताचे अमेरिकेतले उच्चायुक्त (Indian Ambassador in the US)तरणजितसिंग सिद्धू यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांबरोबर बैठका आयोजित करून चर्चा सुरू केली आहे. यातल्या काही बैठका औपचारिक स्वरूपाच्या आणि माध्यमांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, तर अनेक बैठका अनौपचारिक स्वरूपाच्या झालेल्या आहेत. दोन भारतीय चेहरे मोठ्या कामाचे भारताची अमेरिकेतली मुत्सद्देगिरी आता दोन भारतीय वंशाच्या अमेरिकन माणसांमुळे सोपी होऊ शकते. या दोन व्यक्ती मुळात भारतीय वंशाच्या असल्याने भारताबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगून आहेत आणि बायडेन यांच्या कोअर टीमचा ते भाग आहेत. विवेक मूर्ती आणि राज शाह हे दोघेही मागच्या डेमोक्रॅट्सच्या ओबामा सरकारमध्येही प्रशासनात कार्यरत होते. त्या वेळी उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या जो बायडेन यांच्या प्रचाराची धुरा या वेळी मूर्ती यांच्याच खांद्यावर होती. 2014 मध्ये ओबामांचे youngest surgeon general म्हणून मूर्तींना ओळखलं जायचं. आता बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले तर या दोघांनाही प्रशासनात पुन्हा चांगल्या पदावर सामावून घेतलं जाईल, अशी शक्यता आहे. राजीव राज शाह यांनाही ओबामा सरकारमध्ये विशेष कामगिरी देण्यात आली होती. अमेरिकेच्या कृषी विभागाचे प्रमुख वैज्ञानिक म्हणून त्यांची नेमणूक होती. Research, Education and Economics विभागाचे अंडर सेक्रेटरी म्हणून ते काम करत आणि भारतविषयक उपक्रम, आघाडीही त्यांनी तेव्हा सांभाळली होती. United States Agency for International Development (USAID)या संस्थेचे प्रशासक म्हणूनही 2015 पर्यंत त्यांनी काम केलं. भारतीय दूतावास लागला कामाला भारताचे राजदूत तरणसिंग संधू यांनी आफ्रिकन अमेरिकन काँग्रेसमनशी संधान बांधायला सुरुवात केली आहे. उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता असणाऱ्या कमला हॅरिस या गटातल्या. कमला हॅरिस यांचे वडील जमैकन तर आई मूळची भारतीय. त्यामुळे उपराष्ट्राध्यक्ष  भारताबरोबरच्या संबंधांमधला प्रमुख दुवा ठरू शकतात. संधू यांच्या जाहीरपणे झालेल्या काही बैठकांपैकी बऱ्याच डेमोक्रॅटिक खासदारांबरोबरच्या आहेत. त्यामध्ये ते भारतीय- अमेरिकन डेमोक्रॅट अॅमी बेरा यांनाही भेटले. बेरा आशियाविषयक उपसमितीचे अध्यक्ष होते. या भेटीनंतर संधू यांनी ट्वीटही केलं होतं. भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याविषयी आणि Covid साथीच्या सुयोग्य नियोजनाविषयी सहकार्यासंबंधी चर्चा झाली, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अमेरिकेन काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अॅमी बेरा निवडून येण्याची शक्यता आहे. बेरा यांच्याखेरीज आणखी एका भारतीय वंशाच्या डेमॉक्रेटिक उमेदवाराने US काँग्रेसमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांचं नाव आहे प्रमिला जयपाल. पण या जयपाल बाईंबरोबरचे संबंध मोदी सरकारच्या फायद्याचे नाहीत. या भारतीय वंशाच्या खासदारांमुळे अडचण गेल्या वर्षी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रमिला जयपाल यांचा समावेश असणाऱ्या खासदारांच्या गटाला भेटण्यासही नकार दिला होता. याचं कारण आहे जयपाल यांचा काश्मीरविषयी दृष्टिकोन. 370 वं कलम हटवल्यानंतर जयपाल यांनी त्याविरुद्ध जाहीर भूमिका घेतली होती. भारताने काश्मीरमध्ये घातलेले निर्बंध मागे घ्यावेत यासाठी अमेरिकी काँग्रेसमध्ये विधेयक मांडणाऱ्या प्रमिला जयपालच होत्या. त्यांच्या या विधेयकाला कमला हॅरिस यांच्यासह प्रमुख डेमोक्रॅटिक खासदारांनी पाठिंबा दिला होता. अडचणीचे मुद्दे काश्मीर मुद्द्याखेरीज ट्रम्प हरल्यानंतर मोदी सरकारची अडचण करू शकेल अशी एक घोषणा आता काही जण आठवत आहेत. मोदी भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा आणि Howdy Modi या अमेरिकेतल्या कार्यक्मातदेखील अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा दिली जात होती. मोदींच्या प्रचारयंत्रणेची ही घोषणा ट्रम्प यांचाही प्रचार करणारी ठरत असल्याने विरोधी पक्ष दुखावले जातील. आता डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आली तर भारताची ही घोषणा अडचणीची ठरू शकेल, अशी भीती त्या वेळी व्यक्त झाली होती. चीनविरोध आणि COVID-19 ट्रम्प सरकारने मोदींच्या धोरणाला थेट पाठिंबा दर्शवला होता आणि चीनविरोधी भूमिकेतही थेटपणे भारताची बाजू घेतली होती. तो थेटपणा अमेरिकेचं सरकार बदलल्यानंतर कायम राहील का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पण अब की बार ट्रम्प सरकारनंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. Covid-19 च्या महासाथीत भारत- अमेरिकेचं परस्पर सहकार्य दोन्ही देशांना फायदेशीर आहे. शिवाय चीन हा दोन्ही देशांचा समान शत्रू आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध शिगेला पोहोचलं आहे.  त्यामुळे चीनला दाबण्यासाठी भारताची तळी उचलून धरण्यावाचून अमेरिकेला गत्यंतर नाही. त्यामुळे ट्रम्प सत्तेत नसले तरी भारताला सहकार्य करण्याची अमेरिकेची भूमिका नवी पक्षाच्या सरकारलाही बदलायचं कारण नाही. भारत सरकारमधल्या सूत्रांनी News18 ला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा भारताविषयीचा दृष्टिकोन सत्ता बदलल्यानंतरही कायम राहील. जो बायडेन यांनी 15 ऑगस्टला केलेल्या विधानाचा संदर्भ यासाठी त्यांनी दिला. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त व्हर्च्युअल कँपेनदरम्यान बायडेन  म्हणाले होते की, भारताला धोका ठरणाऱ्या अंतर्गत आणि सीमेजवळच्या शक्तींचा  सामना करण्यासाठी ते भारताबरोबर आहेत. भारताबरोबरचा व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणविषयक प्रश्नांचा एकत्रित विचार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासनही बायडन यांनी दिलं होतं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Joe biden, Narendra modi, US elections

    पुढील बातम्या