वॉशिंग्टन, 07 नोव्हेंबर : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीदरम्यान मोठं घमासान झालं असून आता त्याचे पडसाद ट्वीटवरही दिसत आहे. 5 राज्यांचे निकाल येणं अद्याप बाकी असलं तरी जो बायडन विजयाच्या अगदी जवळ आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना केवळ 6 मतांची गरज आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना समोर पराभव दिसत असल्याने त्यांनी दावे आणि आरोप करण्यास सुरुवात केली असून न्यायासाठी कोर्टात धाव घेतली आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यात एकप्रकारे ट्वीटर वॉर सुरू झालं आहे. जो बायडन यांना चिडलेल्या ट्रम्प यांनी खडे बोल सुनावले आहेत. तर दुसरीकडे जो बायडन समर्थकांना आपणच जिंकणार असं आश्वस्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत, बायडन यांनी जबरदस्तीने राष्ट्राध्यक्षपदावर आपला दावा करू नये. हा दावा मला देखील करता येऊ शकतो. आता कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Joe Biden should not wrongfully claim the office of the President. I could make that claim also. Legal proceedings are just now beginning!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 6, 2020
I had such a big lead in all of these states late into election night, only to see the leads miraculously disappear as the days went by. Perhaps these leads will return as our legal proceedings move forward!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 6, 2020
गेल्या काही तासांमधले आकडे हे स्पष्ट सांगत आहेत की आम्ही ही निवडणूक जिंकणार. बायडन यांना आतापर्यंत 264 मतं मिळाली आहेत. विजयासाठी केवळ 6 मतं आवश्यक आहेत.
जो बायडन यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वेळच्या वेळी हे स्पष्ट होत आहे की सर्व जाती, धर्म, प्रांतातील लोकांसह अमेरिकेची विक्रमी संख्या हा बदल घडवून आणू इच्छित आहे असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
What is becoming clearer each hour is that record numbers of Americans — from all races, faiths, regions — chose change over more of the same.
They have given us a mandate for action on COVID and the economy and climate change and systemic racism.
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020
हे वाचा-Parkinson मुळे पुतिन राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार? काय आहे का आजार?
हा वाद न्यायालयात गेल्यानंतर आता मोठा बदल झाला आहे. याचा फटका जो बायडन यांना बसणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. बायडन साधारण 1500 मतांनी पुढे असल्याचे समोर आले होते. त्यातच जॉर्जिया राज्यात पुन्हा मतमोजणी केली जाणार असल्याचे राज्याच्या सचिवांनी सांगितले आहे. जॉर्जिया राज्याच्या सचिवांनी सांगितले की निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी पुन्हा मतमोजणी केली जाणार आहे.
जॉर्जिया राज्यात 16 इलेक्ट्रोरल वोट आहेत. व्हाइट हाउसपर्यंत पोहोचण्यासाठी 538 ‘इलेक्ट्रोरल कॉलेज वोट’ पैकी 270 वोट मिळणं आवश्यक आहे. आतापर्यंत बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 213 इलेक्ट्रोरल मतं मिळाली आहेत. जर बायडन यांना जॉर्जियामध्ये विजय मिळाला तर नेवाडा वा एरिज़ोना (दोन्ही राज्यात बायडन लीडवर ) वा पेन्सिल्वेनिया येथील विजय मिळाल्यानंतर बाइडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात.