Home /News /videsh /

Explainer US Elections : मतदान कधी? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो? जाणून घ्या निवडणुकीची प्रक्रिया

Explainer US Elections : मतदान कधी? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो? जाणून घ्या निवडणुकीची प्रक्रिया

अमेरिकेत 244 वर्षांची लोकशाही परंपरा आहे. (US Elections 2020) निवडणुकीची तारीख, वर्ष, मतदानाची, मतमोजणीची तारीख, आणि नवे राष्ट्राध्यक्ष शपथ कधी घेणार ती तारीखही आधीच ठरलेली असते. पहिल्या टप्प्यापासूनच भारतीय निवडणुका आणि अमेरिकी अध्यक्षीय निवडणुका भिन्न आहेत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : जगात चार प्रकारच्या शासन प्रणाली आहेत. लोकशाही, अध्यक्षीय पद्धत, स्वीस पद्धत आणि कम्युनिस्ट पद्धत. अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे. त्याल अडीच दशकांची परंपरा आहे. अमेरिका आपल्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड पुढच्याच महिन्यात करणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया भारतापेक्षा अगदी वेगळी आहे. दोन्ही देश लोकशाही पद्धतीने चालणारे असले तरी तिथली निवडणूक भारतापेक्षा भिन्न असते. कसं होतं मतदान जाणून घेऊ या. अमेरिका ही 244 वर्ष जुनी लोकशाही पद्धत असून तिथं  निवडणुकीची तारीख, वर्ष, मतदानाची, मतमोजणीची तारीख, निवडणुकीचा पहिला टप्पा, राष्ट्राध्यक्ष शपथ कधी घेणार  हे आधीच निश्चित असतं. भारताप्रमाणे दरवेळी ते जाहीर केलं जात नाही. अमेरिकेतील निवडणूक कोणत्या वर्षी होते? अमेरिकेची निवडणूक दर लीप वर्षात होते. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या आकड्याला चारने भाग जातो ते वर्ष आणि त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. आश्चर्यकारक म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही ठरलेल्या तारखांनाच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका झाल्या होत्या. तसं तर ही प्रक्रिया वर्षभर चालते पण प्रत्यक्ष मतदान आणि शपथविधीची तारीख अमेरिकन राज्यघनेनेच निश्चित केली असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी मतदान होतं आणि त्या पुढच्या वर्षी 20 जानेवारीला नवे अध्यक्ष शपथ घेतात. अधिक मतं म्हणजे विजय असं साधं गणित नाही आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला अधिक मतं मिळाली म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकली असा सरळ अर्थ लावला जात नाही. 2016 मध्ये हिलरी क्लिंटन यांना सध्याचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याहून अधिक मतं मिळाली होती पण त्या पराभूत झाल्या होत्या.  अमेरिकी अध्यक्षांची निवड कोण करतं? अमेरिकेत जनता इलेक्टोरल कॉलेज म्हणजे निवड मंडळाची निवड करते हे मंडळ अध्यक्षांची निवड करतं. अमेरिकी संसदेला अमेरिकी काँग्रेस म्हटलं जातं.या मंडळात आणि अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यसंख्या सारखीच असते. संसदेची दोन सदनं आहेत वरिष्ठ सभागृह सिनेट (भारताची राज्यसभा) आणि कनिष्ठ सदन हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. US Elections : ट्रम्प आणि बायडेन दोघांसाठी मूळ भारतीय का महत्त्वाचे? अमेरिकी जनता सिनेटच्या सदस्यांची थेट निवड करते. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 435 अधिक 3 सदस्य असतात. विशेषाधिकारानुसार वॉशिंग्टन डीसीचे 3 सदस्य असतात. सिनेटमध्ये 100 सदस्य असतात. प्रत्येक राज्याला हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, सिनेट आणि इलेक्टोरल कॉलेजमध्ये समान प्रतिनिधित्व मिळतं. खरंतर अमेरिकेतही अनेक पक्ष आहेत पण रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे पक्ष इतके मोठे आहेत की त्या दोघांभोवतीच सगळं राजकारण फिरत राहतं. लिस्ट सिस्टम काय असते? इथं इलेक्टोरल कॉलेजची निवडणूक लिस्ट सिस्टिमने होते. उदाहरणार्थ कॅलिफोर्निया राज्यात रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्ष प्रत्येकी 55 उमेदवारांची यादी जाहीर करतात. मतदार त्या उमेदवारांच्या यादीला मत देतात त्यामुळे एखादा उमेदवार विजयी किंवा पराभूत न होता संपूर्ण यादी विजयी होते किंवा संपूर्ण यादी पराभूत होते. याच कारणामुळे ट्रम्प इलेक्टोरल कॉलेजमध्ये विजयी झाले होते. प्रेसिडेन्सी प्रायमरीज यंत्रणा काय असते? भारतात भाजप किंवा काँग्रेसमधून कोण पंतप्रधान होणार हे जनतेला ठरवता येत नाही पण अमेरिकेत जनता थेट रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवू शकते. जरी एकाच पक्षाच्या अनेक नेत्यांनी आपला दावा जाहीर केला तरीही जनता त्यापैकी एका नेत्याला या पदासाठी निवडते. अमेरिकेत चेन सिस्टिम आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार जनता आणि पक्षाचे सदस्य ठरवतात यालाच प्रेसिडेंसी प्रायमरीज म्हणतात. 1970 पासून ही पद्धत सुरू झाली. अमेरिकेतील 34 राज्यांत प्रेसिडेंसी प्रायमरीज तर 156 राज्यांत कॉकस सिस्टिम आहे. कॉकस सिस्टिममध्ये पक्षातील मोठा नेता अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवतो. प्रेसिडेन्सी प्रायमरीजमध्ये कार्यकर्ते आपला नेता निवडतात त्यालाच नॅशनल कन्व्हेन्शन निवडणूक म्हणतात. नॅशनल कन्व्हेंन्शनमध्ये डेलिगेट्स आणि सुपर डेलिगेट्स असतात. हे दोन्ही पक्षांचे स्वतंत्र असतात. डेलिगेट्स आणि सुपर डेलिगेट्स यात काय फरक आहे? नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये राज्यानी निवडलेल्या व्यक्तींना डेलिगेट्स म्हणतात. त्या पक्षातून आधी अध्यक्ष झालेले आणि खासदार झालेले लोक सुपर डेलिगेट्स असतात. नॅशनल कन्व्हेंशनची निवडणूक ऑगस्टमध्ये होते. या कन्व्हेंशनमध्येच दोन्ही पक्ष आपला अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करतात. उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड अध्यक्षपदाचा उमेदवार त्याच्या मनाने करू शकतो. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रचार होतो. या काळात अब्जावधी रुपयांचा खर्च केला जातो. त्या दृष्टिनी ही जगातील सर्वांत महागडी निवडणूक आहे. अमेरिकेत निवडणूक प्रचार कसा करतात? अमेरिकेत मोठ्या प्रचार सभा होत नाहीत. टीव्हीवर लाइव्ह चर्चेत उमेदवार आपली मतं मांडतात.  या वर्षी या चर्चा झाल्या आहेत. आता संपूर्ण अमेरिकेत 3 नोव्हेंबरला एकाच दिवशी मतदान होणार आहे. जनता इलेक्टोरल कॉलेजच्या उमेदवारांसाठी मत देईल. याच दिवशी अध्यक्ष पद, संसदेचे सदस्य, काउन्सिलर आणि गव्हर्नर सगळ्या पदांसाठी निवडणूक होते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये निवडून आलेल्या सदस्यांवर घटनेचं बंधन नाही पण साधारणपणे ते त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला मत देतात. ज्या उमेदावाराला 270 किंवा त्याहून अधिक मतं मिळतात तो जिंकतो. 20 जानेवारीला शपथग्रहण सोहळा होतो. या वर्षीच्या (2020) निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे  उमेदवार कोण आहेत? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे तर जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत. ट्रम्प यांनी माइक पेन्स यांना तर बायडन यांनी कमला हॅरिस यांना उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडलं आहे.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Donald Trump, US elections

पुढील बातम्या