वॉशिंग्टन डीसी, 14 ऑक्टोबर : अमेरिकी अध्यपदाच्या निवडणुकीत (US presidential election 2020) भारतीय अमेरिकी नागरिकांना (Indian Americans) खूप महत्त्व आहे. त्यामुळेच डेमोक्रॅटिक पक्ष (Democrats) आणि रिपब्लिकन पक्ष (Republicans) दोन्हींचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या मतांवर डोळा ठेऊन आहेत. या वर्षी 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवडल्यामुळे तर तिथला भारतीय समाज अधिक चर्चेत आला आहे. या निवडणुकीत भारतीय अमेरिकींच्या मतांना किती किंमत आहे जाणून घेऊया. कमला यांची आई भारतीय तर वडिल मेक्सिकन आहेत. त्यामुळे ब्लॅक चर्चसोबतच त्यांच्यावर हिंदू संस्कारही झाले आहेत. त्यांनीही चेन्नईशी असलेलं आपलं नातं जपलं असून त्या जाहीरपणे त्याचा वारंवार उल्लेखही करतात. टक्केवारी आणि क्षमता अमेरिकेच्या लोकसंख्येचाय 1.5 टक्के भारतीय अमेरिकी आहेत ही संख्या साधारण 40 लाखांहून अधिक होते. पण आपल्या शिक्षणामुळे बहुतांश भारतीय अमेरिकी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला निधी देणाऱ्या पॉवर सेंटर्समध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. अमेरिकेत परदेशातून स्थायिक झालेल्या गटांत सर्वांत मोठा गट मॅक्सिकोतील लोकांचा असून दुसरा मोठा गट भारतीयांचा आहे. त्यामुळेही महत्त्व वाढलं आहे. अमेरिकी काँग्रेसमध्ये भारतीय दलीपसिंह सौंद यांनी 1957 साली दक्षिण कॅलिफोर्नियातून निवडणूक जिंकून ते हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पोहोचले होते. 2005 मध्ये बॉबी जिंदन, 2011 मध्ये प्रमिला जयपाल हेही निवडून आले होते. सध्या अमेरिकी काँग्रेस म्हणजे संसदेत कमला हॅरिस यांच्यासह 5 भारतीय अमेरिकी नागरिक आहेत. राजकारणात भारतीय का महत्त्वाचे**?** शिक्षण आणि आर्थिक समृद्धीमुळे इथला भारतीय समाज अमेरिकेतील निवडणुकीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान देतो. या वर्षीच्या निवडणुकीतही भारतीय समाज प्रमुख देणगीदारांमध्येच आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन दोघंही या समाजाची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय अमेरिकीं****चा कल कुणाकडे ? भारतीय अमेरिकी समाजातील मोठा गट रिपब्लिकन पक्षाचा समर्थक मानला जातो. पण रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज एलन या उमेदवारानी 2006 मध्ये भारतीयांना माकड म्हणून हिणवलं होतं त्यामुळे थोडे कट्टर स्वरूपाचा पक्ष अशीही रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा आहे. त्यामुळे असे मुद्दे काढून ही मतं फिरवण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्षी राजकीय विश्लेषक कार्तिक रामकृष्ण यांनी केलेल्या सर्वेक्षणातून 54 टक्के भारतीय अमेरिकींचा कल डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडन यांच्याकडे तर 29 टक्के भारतीय अमेरिकींचा कल ट्रम्प यांच्याकडे आहे असं दिसतं. गेल्या काही दशकांत डेमोक्रॅटिक पक्षाने बाहेरून आलेल्या अल्पसंख्य समाजाच्या हिताबद्दल अधिक संवेदनशीलता दाखवली आहे. त्याचा दुसरा भाग म्हणजे भारतीय अमेरिकींना उदारमतवादच आवडतो. पण 84 टक्के भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांच्या बाजूने मतदान केलं होतं हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे भारतीय अमेरिकी समाज कुणाच्या पारड्यात आपल्या मतांचं माप टाकतो हे पहायला हवं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.