

नुकताच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदाचा निकाल लागला असून जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. तर भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस या पदभार स्वीकारत आहेत.


जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या विजयाचा जल्लोष लोक थाळ्या-वाद्य वाजवून डान्स करून साजरा करत आहेत. केवळ अमेरिकाच नाही तर देश-विदेशात हा जल्लोष साजरा होत आहे.


भारतातही कमला हॅरिस यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमिळनाडूमधील एका गावात सडा आणि रांगोळी काढण्यात आली आहे.


कमला हॅरिस यांचं मूळ गाव तमिळनाडूमधील तिरुवरुर जिल्ह्यातील थुलेसेंद्रपुरम गावात हॅरिस यांच्या निवडणुकीतील विजयानिमित्तानं खास रांगोळी काढण्यात आली आहे.


घरासमोर रांगोळी काढून कमला हॅरिस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या गावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.