Home /News /videsh /

रुग्णांच्या मृत्यूनंतरही मरत नाही कोरोना तर..., तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

रुग्णांच्या मृत्यूनंतरही मरत नाही कोरोना तर..., तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

अद्याप कोरोनावर ठोस उपाय कोणालाही शोधता आलेले नाही. यातच आता तज्ज्ञांनी कोरोना विषाणू हवेत फिरता राहतो, असा खुलासा केला आहे.

  नेब्रास्का, 02 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. दररोज मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरात तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्याप कोरोनावर ठोस उपाय कोणालाही शोधता आलेले नाही. यातच आता तज्ज्ञांनी कोरोना विषाणू हवेत फिरता राहतो, असा खुलासा केला आहे. याचा अर्थ कोरोनाबाधित रुग्ण एखाद्या खोलीत असेल, तर त्या जागेत काही काळ कोरोनाविषाणू हवेत राहतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या नेब्रास्का विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेमध्ये कोरोनाच्या अस्तित्वाचा अभ्यास केला होता. नेब्रास्का विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की रूग्ण एका ठिकाणाहून गेल्यानंतर कोरोना विषाणू अनेक तास वातावरणात राहू शकतो. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, रुग्णाच्या मृत्यूनंतरही कोरोना विषाणू काही प्रमाणात हवेत राहतो. वाचा-क्वारंटाईमधल्या आहाराबाबत WHO कडून महत्त्वाच्या सुचना, ‘हे’ खाणं तुमच्यासाठी चांगलं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात कोरोनाबाधित रूग्ण राहत असल्यास, त्याला घरी सोडल्यानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर सभोवतालच्या परिसरात मात्र कोरोना जीवंत असो. यापूर्वीही काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले होते की कोरोना विषाणू केवळ रूग्णाद्वारेच पसरत नाही तर बर्‍याच ठिकाणांच्या पृष्ठभागावर देखील असू शकतो. वाचा-या' शहरात पडलाय मृतांचा खच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच झाला कोरोना अभ्यासाच्या परिणामी कोरोना व्हायरस बाधित रूग्णाची काळजी घेणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी संरक्षक कपडे किती महत्वाचे आहेत हे दर्शवते. बर्‍याच देशांमधील डॉक्टर सध्या वैयक्तिक संरक्षक उपकरणाच्या (पीपीई) कमतरतेमुळे झगडत आहेत. अनेक ठिकाणी उपचार करणार्‍या डॉक्टरांनाही संसर्ग झाला आहे. चीनमध्ये 3300 तर, स्पेनमध्ये 12 हजार, इटलीमध्ये 5 हजारपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी या आजाराने बाधित झाले आहेत. त्याच वेळी, जगभरात या रोगामुळे 300 हून अधिक डॉक्टर मरण पावले आहेत. वाचा-...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती
  अजूनही संशोधन सुरू जगभरातील वैद्यकीय शास्त्रज्ञ अद्याप संक्रमित व्यक्तींमध्ये हवेच्या किंवा कोणत्याही पृष्ठभागाच्या संपर्कात आल्यामुळे किती रूग्णांवर परिणाम झाले आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात किती रुग्ण आले याचा कोणताही डेटा उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. नेब्रास्का विद्यापीठाच्या अभ्यासात 11 रूग्णांच्या खोल्यांचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमधून कोरोना खोलीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी हवेत दिसतो. विद्यापीठातील तज्ज्ञांचे आणि संक्रमित आजाराच्या अभ्यासाचे नेतृत्व करणारे जेम्स लॉलर म्हणाले की, आम्हाला जे निकाल मिळाले आहेत त्यामुळे आमच्या संशयाचे निराकारण झाले आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या