कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. लाखो लोक या व्हायरसच्या विळाख्यात आले आहेत. तर हजारो नागरिकांनी जीव गमावला आहे. या रोगावर अद्याप कोणतीही लस किंवा औषधं उपलब्ध नाही.
आतापर्यंत या रोगातून ठीक झालेल्या रूग्णांचा विचार केल्यास रोगप्रतिकारशक्ती एवढा एकच उपाय आहे. या महामारीपासून वाचवण्यासाठी नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
अशावेळी नागरिकांनी काय खावं आणि काय टाळावं याबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्वारंटाईनमध्ये असताना पॅकेटबंद, डब्बाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
क्वारंटाईनमध्ये आपला दररोजचा आहार हा पौष्टिक असावा. आहारात जास्तीत जास्त फायबर फ्रुट्स जसे की, भाज्या, फळे, डाळी, तसेच ओट्स, ब्राउन पास्ता, ब्राऊन राईस, क्विनोआ, संपूर्ण गहू ब्रेड इत्यादी अधिकाधिक फायदेशीर पदार्थ खावेत जे सहज पचतात.
क्वारंटाईनमध्ये असताना सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात कमीत कमी ८-९ ग्लास पाणी प्यावं.
शक्य असल्यास एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावं. तसेच काकडी, गाजर, पेपरमिंट, लॅव्हेंडर, रोझमेरी आणि बेरी जेवणाबरोबर खावं.
WHO च्या गाइडलाइननुसार क्वारंटाईनमध्ये असताना दारूचं सेवन करू नये. अल्कोहोलमुळे कोरोनाचा धोका वाढतो.
लाल आणि चरबीयुक्त मांस, लोणी, फुल फॅट दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ, पाम तेल, नारळ तेलाचे सेवन कमी करा. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी फळांचा समावेश करा