Home /News /videsh /

'या' शहरात पडलाय मृतांचा खच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या हजारो डॉक्टरांनाच झाला कोरोना

'या' शहरात पडलाय मृतांचा खच, रुग्णांवर उपचार करणाऱ्या हजारो डॉक्टरांनाच झाला कोरोना

कोरोना विषाणू सध्या जगाच्या समोर अदृश्य शत्रूप्रमाणे उभे आहे. या कोरोनाला हरवण्यासाठी सर्व वैद्यकिय कर्मचारी लढा देत आहेत.

  न्यूयॉर्क, 02 एप्रिल : कोरोना विषाणू सध्या जगाच्या समोर अदृश्य शत्रूप्रमाणे उभे आहे. या कोरोनाला हरवण्यासाठी सर्व वैद्यकिय कर्मचारी लढा देत आहेत. मात्र काही देशांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चीनमध्ये 3300 तर, स्पेनमध्ये 12 हजरा, इटलीमध्ये 5 हजारपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचारी या आजाराने बाधित झाले आहेत. त्याच वेळी, जगभरात या रोगामुळे 300 हून अधिक डॉक्टर मरण पावले आहेत. अमेरिकेत सध्या 2 लाख 16 हजार 154 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 हजार 115पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान येत्या काळात मृतांच्या संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांच्या तब्बल 80% रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सर्वात जास्त भार आहे. वाचा-तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी यासंदर्भात, वैद्यकीय कर्मचार्‍यांनी कोरोनाविरूद्धच्या त्यांच्या लढाविषयी सांगितले की ते ते कसे झगडत आहेत. ख्रिश्चन फेल्ड्रान यांनी आपल्या अनुभवाबाबत सांगताना, "दिवसा कधी कधी रात्री मी रुग्णलयात असते. त्यामुळे घरातल्यांची सतत चिंता असते.  मुलाला निरोप देते आणि मास्कने संपूर्ण चेहरा झाकते. तेव्हा एखाद्या लढाईला जात आहे, असा भास होतो, असे मत व्यक्त केले. अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अमेरिकेत वाढत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर सध्या कोरोनाचे नवीन केंद्र बनले आहे. दर 2.9 मिनिटाला न्यूयॉर्कमध्ये एकाचा मृत्यू होत आहे. परिस्थिती एवढी वाईट आहे की, रुग्णालयाजवळ मृतदेह ठेवण्यासाठी एक ट्रक उभा करण्यात आला आहे. वाचा-24 तासात तब्बल 328 जणांना कोरोनाची लागण, देशात मृतांचा आकडा वाढताच न्यूयॉर्कमध्ये रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे देशासमोर मोठे आव्हान आहे. शहरातील सर्व हॉटेल भाडेतत्त्वावर असून त्यांचे रूग्णालयात रुपांतर केले गेले आहे. तर, देशातील सर्व शहरातील डॉक्टरांना न्यूयॉर्कमध्ये बोलण्यात आले आहे. न्यूयॉर्कमधील परिस्थिती ही चीनच्या वुहानपेक्षाही वाईट आहे. वाचा-...तर येत्या 7 दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढणार, WHOने व्यक्त केली भीती
  9/11 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेवर आत्मघातकी हल्ल्यांची मालिका होती. याच दिवशी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सला चार प्रवासी विमानांनी टक्कर दिली होती. तर, दोन विमाने कोसळली होती. त्यामधील सर्व लोक आणि इमारतींमध्ये काम करणारे बरेच लोक ठार झाले होते. दोन्ही मोठ्या इमारती २ तासाच्या आत कोसळल्या, जवळील इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आणि अन्य इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. डेली मेल यूएसच्या वृत्तानुसार या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या