जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाणी विद्यार्थी झटकतायत दप्तरावरची धूळ, तालिबानच्या घोषणेवर मुलींनीही ठेवलाय विश्वास

अफगाणी विद्यार्थी झटकतायत दप्तरावरची धूळ, तालिबानच्या घोषणेवर मुलींनीही ठेवलाय विश्वास

अफगाणी विद्यार्थी झटकतायत दप्तरावरची धूळ, तालिबानच्या घोषणेवर मुलींनीही ठेवलाय विश्वास

गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी कॉलेज पुन्हा सुरु होत असल्यामुळे अफगाणिस्तानातील विद्यार्थी खूश आहेत. मात्र या आनंदाला एक दुःखाची किनारही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबुल, 13 जानेवारी: अफगाणिस्तानमधील (Afghanistan) विद्यापीठं (Universities) आणि महाविद्यालयं (Collages) सुरु करण्याची (Reopen) घोषणा तालिबान सरकारनं (Taliban Government) केली आहे. विशेष म्हणजे मुलींनाही (Girls to get admissiion) शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. अर्थात, मुलींसाठी वेगळी आसनव्यवस्था करण्यात येणार असून कडक नियमांच्या अंमलबजावणीसह लवकरच वर्ग सुरु होणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत.   मुलींनाही मिळणार प्रवेश तालिबानची यापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता होती, तेव्हा मुलींच्या शिक्षणाला परवानगी नव्हती. प्राथमिक शिक्षणानंतर मुलींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसे. मात्र अमेरिका पुरस्कृत सरकार असण्याच्या काळात देशात अनेक सुधारणा झाल्या आणि एक पिढी शिकून तयार झाली. देशातील आणि जगातील बदललेली परिस्थिती पाहता आता तालिबान सरकारनंही आपलं धोरण सौम्य केल्याचं दिसत असून मुलींना कॉलेजमध्ये येण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.   काय आहे अट? मुलांना आणि मुलींना बसण्यासाठी वेगवेगळी आसनव्यवस्था करणं महाविद्यालयांना बंधनकारक असणार आहे. मुलं आणि मुली एकमेकांना दिसणार नाहीत, अशा प्रकारची सुविधा शाळांना करावी लागणार आहे. शिवाय ज्या वर्गात मुली असतील, तिथे शक्यतो महिला शिक्षिका असाव्यात किंवा ज्येष्ठ शिक्षक असावेत, अशीही अट तालिबानने घातल्याची माहिती आहे.   विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान ऑगस्ट महिन्यात तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून देशातील शाळा आणि कॉलेज बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याचं चित्र आहे. सलग सहा महिने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा कुठल्याच शिक्षणाचा विद्यार्थ्यांना गंध नसल्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं मत मतिउल्लाह फिरोज नावाच्या एका विद्यार्थ्यानं माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.   हे वाचा -

परदेशातून निधी मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी आणि विद्यापीठं पुन्हा सुरु व्हावीत, यासाठी काही शेजारी देशांनी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धोरण आखता आलं नसल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात