Home /News /videsh /

‘बकवास पासपोर्ट’च्या बाबतीत पाकिस्तानचा चौथा नंबर, सर्वोत्तम पासपोर्ट युरोपीय देशांचेच

‘बकवास पासपोर्ट’च्या बाबतीत पाकिस्तानचा चौथा नंबर, सर्वोत्तम पासपोर्ट युरोपीय देशांचेच

पाकिस्तानचा पासपोर्ट हा उत्तम पासपोर्टच्या यादीत खालून चौथ्या स्थानी असल्याचं दिसून आलं आहे. तर युरोपनं या यादीत अव्वल स्थानी नंबर लावला आहे.

    नवी दिल्ली, 13 जानेवारी: जगातील सर्वोत्तम पासपोर्टच्या (Best Passports) यादीत पाकिस्ताननं (Pakistan) शेवटून चौथा क्रमांक (Fourth Last) पटकावला आहे. याचाच अर्थ जगातील बकवास पासपोर्टच्या (worst passport) बाबतीत पाकिस्तानचा चौथा क्रमांक लागत असल्याचं नुकत्याच जाहीर झालेल्या यादीतून दिसून आलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 (Henlay Passport Index) ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात नेहमीप्रमाणेच युरोपातील देशांनी बाजी मारल्याचं चित्र आहे.  काय आहे निकष? ज्या देशाच्या पासपोर्टचा वापर करून व्हिसाशिवाय अधिकाधिक देशांत प्रवेश मिळू शकतो, तो पासपोर्ट सर्वोत्तम मानला जातो. तर ज्या देशाच्या पासपोर्टला अधिकाधिक देशांत व्हिसा घेऊनच जावं लागतं, त्या पासपोर्टला सर्वात कमी गुण दिले जातात. त्यानुसार युरोपातील अनेक देशांना अधिक गुण मिळाल्याचं या यादीतून दिसून आलं. पाकिस्तानच्या पासपोर्टचा वापर करून व्हिसाशिवाय केवळ 31 देशांमध्येच जाणं शक्य होत असल्यामुळे पाकिस्तानचा खालून चौथा नंबर लागल आहे.  2006 पासून यादी हेनले पासपोर्ट यादी जाहीर होण्याची सुरुवात झाली ती 2006 सालापासून. पासपोर्ट आणि व्हिसा यांच्याबाबत संशोधन करून वस्तुस्थितीवर आधारित मानांकन या यादीत करण्यात येतं. सध्या कोरोनामुळे प्रवासावर असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर संशोधन आणि यादी तयार करण्यासाठीच्या प्रक्रियेला उशीर होत गेला आणि अडथळे आले, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर कोरोनामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी लावलेले निर्बंध गृहित न धरता केवळ पासपोर्ट आणि व्हिसाचा कोरोनापूर्व निकष लावूनच ही यादी तयार करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.  हे वाचा - युरोप अव्वल जपान आणि सिंगापूर या देशांचा पासपोर्ट असेल तर जगातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. साऊथ कोरिया आणि जर्मनी यांना या यादीत विभागून दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. या देशांच्या पासपोर्टवर व्हिसाशिवाय 190 देशांमध्ये जाणं शक्य होतं. तर फिनलँड, इटली, लक्झमबर्ग आणि स्पेन तिसऱ्या स्थानी आहेत. या देशातील नागरिक 189 देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Japan, Pakistan, Passport, South korea

    पुढील बातम्या