मराठी बातम्या /बातम्या /विदेश /2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिक युद्धकैदी? सर्वांना रशियाला नेल्याचा दावा

2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिक युद्धकैदी? सर्वांना रशियाला नेल्याचा दावा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, सोमवारी 1,847 मुलांसह 11,500 हून अधिक लोकांना युक्रेनमधून रशियाला पाठवण्यात आलं. त्यांच्या विनंतीवरून या लोकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आल्याचा दावा मॉस्कोकडून करण्यात आला आहे.

कीव, 3 मे : रशिया आणि युक्रेनमध्ये 68 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. एकीकडे रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्रं आणि बॉम्बने सातत्यानं हल्ले करत आहे. तर, युक्रेनमधील अनेक लोकांना, मुलांना युक्रेनमधून बाहेर काढून रशियात आणल्याचा दावा युक्रेननी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनचं म्हणणं आहे की, सुमारे दोन लाख मुलांना जबरदस्तीने रशियात नेण्यात आलं आहे.

कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, 2 लाख मुलांसह 11 लाख युक्रेनियन नागरिकांना रशियन सैनिकांनी जबरदस्तीने बंदी बनवलं आहे. तर, रशियन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने, 24 फेब्रुवारीपासून 1,96,356 मुलांसह 10,92,137 युक्रेनियन लोकांना रशिया-व्याप्त डॉनबासमधून रशियात आणण्यात आले आहे.

सोमवारी 11500 मुलांना रशियाला नेण्यात आलं

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, कीव अधिकाऱ्यांच्या समन्वयाशिवाय सोमवारी 1,847 मुलांसह 11,500 हून अधिक लोकांना युक्रेनमधून रशियाला पाठवण्यात आलं. त्यांच्या विनंतीवरून या लोकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आल्याचा दावा मॉस्कोकडून करण्यात आला आहे. तर, युक्रेनचं म्हणणं आहे की, रशिया युक्रेनियन लोकांना जबरदस्तीने रशियात नेत आहे.

हे वाचा - ..त्या दिवशी जेलेन्स्की परिवारासह तिथेच होते! रशियन फौजा अचानक पोहोचल्या जवळ..

रशियन हल्ल्यात आतापर्यंत 3,153 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू

UN च्या अहवालानुसार, रशियन हल्ल्यामुळे 24 फेब्रुवारीपासून 3,153 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 3,316 जखमी झाले आहेत. तर, ओडेसा येथे रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि 17 वर्षांची मुलगी जखमी झाली.

हे वाचा -व्लादिमीर पुतिन यांना पार्किन्सन? शरीराच्या अनियंत्रित हालचालींमुळे अफवा VIDEO

स्टील कारखान्यातून 100 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं

रशियन सैन्याने वेढलेल्या मारियुपोल येथील अजोव्हस्टल स्टील प्लांटमधून बाहेर काढलेले 100 नागरिक जवळच्या झापोरिझिया शहरात पोहोचले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी याबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे आभार मानले आहेत.

First published:

Tags: Russia Ukraine, Russia's Putin, Ukraine news