मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनानं माय लेकीला कायमचं केलं वेगळं! बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांनी 28 वर्षीय नर्सचा मृत्यू

कोरोनानं माय लेकीला कायमचं केलं वेगळं! बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांनी 28 वर्षीय नर्सचा मृत्यू

 9 महिने आपल्या गर्भात वाढवलेल्या लेकराला या माऊलीला पाहताही आलं नाही, त्याआधीच तिचा कोरोनाने मृत्यू झाला.

9 महिने आपल्या गर्भात वाढवलेल्या लेकराला या माऊलीला पाहताही आलं नाही, त्याआधीच तिचा कोरोनाने मृत्यू झाला.

9 महिने आपल्या गर्भात वाढवलेल्या लेकराला या माऊलीला पाहताही आलं नाही, त्याआधीच तिचा कोरोनाने मृत्यू झाला.

  • Published by:  Priyanka Gawde

लंडन, 16 एप्रिल : कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी लोकांची सेवा करत आहेत. मात्र आता त्यांनाच कोरोनाने आपल्या जाळ्याच ओढलं आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशाच एका 28 वर्षीय नर्सचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे पाच दिवसांपूर्वीच या नर्सने बाळाला जन्म दिला होता. पाच दिवसांतच कोरोनाने या माय-लेकाला वेगळं केलं.

28 वर्षीय मेरी अज्यापोंग नर्स म्हणून काम करत होती. गर्भवती असल्यामुळे तिला काही दिवस सुट्टी देण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात तिची तब्येत खालावल्यामुऴे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर कोरोना तपासणी केल्यानंतर मेरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलं आहे. गर्भवती असल्यामुळे मेरीची प्रकृती गंभीर होती. तरी, डॉक्टरांनी सी-सेक्शनद्वारे मेरीची प्रसुती केली. मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर पाच दिवसांनी मेरीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मेरीनं मुलीला जन्म दिला असून, तिचं नाव मेरी ठेवण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी, कोरोनाने या लेकीच्या डोक्यावरचं मायचं छत्र हरवलं. दरम्यान मेरीच्या मुलीचीही कोरोना तपासणी करण्यात आली आहे.

वाचा-लॉकडाऊमध्ये धक्कादायक बातमी, बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले 3 हजार लोक

एप्रिल 5 रोजी मेरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलं होतं. त्यानंतर 7 एप्रिल रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र तेव्हाच मेरीची प्रकृती ढासळली होती. दरम्यान, मेरीच्या कुटुंबासाठी रुग्णालयाच्या वतीने 55 हजार युरो जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी जमा केली आहे. मेरीच्या मुलीच्या नावाने ही रक्कम दिली जाणार आहे. मेरीच्या मृत्यूनंतर तिच्या कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले.

वाचा-भारतात लवकरच तयार होणार कोरोनाची लस? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

मेरी काम करत असलेल्या रुग्णालयाने तीनं गरोदर असताना कोरोना रुग्णांची तपासणी केली नाही किंवा त्यांच्या संपर्कात आली नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांनी पीपीईशिवाय त्यांना रुग्णांवर उपचार करावे लागत होते असे सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोनाने हाहाकार माजला आहे. सध्या 98 हजारहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 12 हजार 868 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-नर्सिंग होममध्ये धक्कादायक परिस्थिती, जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published:

Tags: Corona