Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॉकडाऊमधील सर्वात धक्कादायक बातमी, बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले 3 हजार लोक

लॉकडाऊमधील सर्वात धक्कादायक बातमी, बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले 3 हजार लोक

व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मदुरै, 16 एप्रिल : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. संसर्ग रोखण्यासाठी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी घरी राहण्याचं आवाहन पोलीस आणि पंतप्रधान मोदींकडून केलं जात आहे. तमिळनाडूमध्ये मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान मोदींचं आवाहन न जुमानता आणि प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या नियमांना पायदळी तुडवत हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते. ही घटना मदुरै या परिसरात घडल्याचं पाहायला मिळालं. इथे जमलेल्या कुणालाही कोरोनाची भीती नव्हती का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. देशभऱात जमावबंदी लागू असतानाही हजारोंच्या संख्येनं लोक इथे उपस्थित होते.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी मदुरै इथे जमलेल्यांपैकी 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे एफआयआर दाखल कऱण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

हे वाचा-'...आता त्यांना काय खाऊ घालू' 5 घोड्यांचा मृत्यूमुळे टांगेवाला रडला

लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

तामिळनाडू पोलिसांनी बुधवारी सांगितले की, लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत सुमारे दोन लाख एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, तर दीड लाखाहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. दुसरीकडे, मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांना 100 रुपये दंड आकारला जाईल आणि त्याचप्रमाणे वाहनचालकांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

देशांतील 2,083,237 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेतय. तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार 610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजारहून अधिक आहे. तर आतापर्यं 414 रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचा-नर्सिंग होममध्ये धक्कादायक परिस्थिती, जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms