जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात लवकरच कोरोनाची लस तयार होणार? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

भारतात लवकरच कोरोनाची लस तयार होणार? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

भारतात लवकरच कोरोनाची लस तयार होणार? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

कोरोनाची लस तयार करण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग होऊ शकेल या दिशेने मदत होईल, असा दावा गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गांधीनगर, 16 एप्रिल : चीनमधून इतर देशांमध्ये शिरकाव केलेल्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. भारतही याला अपवाद नाही. युरोपातील अनेक देशांमध्ये झालेली भयंकर परिस्थिती भारतावर येऊ नये, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही या व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत लॉकडाऊनच्या कालावधीत वाढही करण्यात आली आहे. एकीकडे ही चिंताजनक बाब असताना गुजरातमधून दिलासादायक बातमी आली आहे. कोविड-19 च्या जीनोम स्रावांविषयी गुजरातच्या शास्त्रज्ञांना माहिती मिळाली आहे. ज्यामुळे कोरोनाची लस तयार करण्यासाठी कोणत्या औषधाचा उपयोग होऊ शकेल या दिशेने मदत होईल, असा दावा गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. याबाबत येत्या काही काळात अजून काम होऊन लस तयार करण्यात यश येतं का, हे पाहावं लागेल. वास्तविक, गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर ही देशातील एकमेव प्रयोगशाळा आहे जिथे (साथीचा रोग) सर्व देशभर ( खंडभर) आपत्ती उद्भवल्यास व्हायरसच्या जीनोमवर काम करते. त्यामुळे जर कोरोनावर लस तयार करण्यात भारताला यश आलं तर या संकटाविरोधातील लढाईतील ते एक मोठे यश असू शकते. लस तयार झाली नाही तर… WHOच्या म्हणण्यानुसार कोव्हिड-19 हा 2009मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा 10 पटीने भयंकर आहे. कोरोनापासून वाचवण्यासाठी आता फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे लस, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले. WHOचे महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी जिनिव्हा येथे घेतलेल्या बैठकीत सांगितले की, ही संस्था जगातील सर्वत्र पसरलेल्या नवीन विषाणूबद्दल सतत शिकत आहे. या विषाणूने जवळजवळ 1 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती किती भीषण आहे हे कळत आहे. ‘कोव्हिड-19चा वेगवान प्रसार होत आहे आणि हे आपल्याला माहीत आहे की हा प्राणघातक आहे. 2009मध्ये आलेल्या स्वाइन फ्लूपेक्षा 10 पटीने हा रोग खतरनाक आहे. स्वाइन फ्लूनेही लाखो लोकांचा जीव घेतला होता. मात्र कोरोनामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,’ असे टेड्रॉस यांनी यावेळी सांगितले. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात