मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नर्सिंग होममध्ये धक्कादायक परिस्थिती, जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

नर्सिंग होममध्ये धक्कादायक परिस्थिती, जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

अमेरिका आणि युरोपात सर्वात जास्त भीषण परिस्थिती आहे. अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका आणि युरोपात सर्वात जास्त भीषण परिस्थिती आहे. अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका आणि युरोपात सर्वात जास्त भीषण परिस्थिती आहे. अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

न्यू जर्सी, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. जगभरात 20 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 1 लाख 34 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात अमेरिका आणि युरोपात सर्वात जास्त भीषण परिस्थिती आहे. अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील नर्सिंग होममध्ये तब्बल 17 मृतदेह पोलिसांना आढळले.

न्यू जर्सी शहरातील पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने नर्सिंग होमच्या बाहेर शेडमध्ये मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. जेव्हा पोलीस दाखल झाले तेव्हा त्यांना तब्बल 17 मृतदेह सापडले. या बातमीनंतर संपूर्ण देश हादरला आहे.  तर, पोलीस प्रमुख एरिक सी. डॅनिअलसन यांनी, “लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे सध्या येथील लोकं भारावून गेली आहेत. हे मृतदेह कोणी ठेवले याचा शोध सुरू आहे", असे सांगितले.

वाचा-भारतात लवकरच तयार होणार कोरोनाची लस? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

दरम्यान मृतदेह सापडलेल्या 17 जण ही अंडोवर सबक्युट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर I आणि II मधील कर्मचारी असण्याची शक्यता आहे. येथे याआधी 68 जणांचा मृत्यू झाला होता त्यातील 26 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले होते. राज्यातील बहुतेक नर्सिंग होममध्ये कोरोनाव्हायरसची किमान एक घटना नोंदवली जात आहे. यात न्यू जर्सीमध्ये बुधवारपर्यंत 6 हजार 815 रूग्णांना कोरोनाची लागण झाली. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत 351 कोरोनाव्हायरस संबंधित मृत्यूंपैकी कमीतकमी 45 लोक वृद्ध होते.

वाचा-देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार पार, आतापर्यंत 414 रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेत मृत्यू तांडव

अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. सध्या 6 लाख 20 हजारांहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहेत. तर 27 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये 1 लाख 75 हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, स्पेनमध्ये 18 हजार 500 हून अधिकजणांचा बळी. त्याचबरोबर इटलीत एक लाख 65 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर, जगभरात आतापर्यंत 5 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

वाचा-'कोरोनामुळे नाही तर भुकमारीने मरू' पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा प्रसंग

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published:

Tags: Corona