अजमान, 13 सप्टेंबर : युएइमध्ये झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, गृह मंत्रालयाच्या एअर अॅम्ब्युलन्स टीमला एअरलिफ्ट करून एका आशियाई माणसाची सुटका केली. हा अपघात अजमानमधील अल मानमा येथे घडला.
या अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय रुग्णवाहिकेतर्फे संचालकांना इशारा देण्यात आला की यात एक व्यक्ती गंभीरपणे जखमी झाली आहे, त्यानंतर लगेचच एअरलिफ्ट करण्यात आलं. काही वेळात एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टरने राष्ट्रीय रुग्णवाहिकेच्या सहकार्याने दुर्घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी व्यक्तीला शारजाहमधील अल कस्सीमि रुग्णालयात हलविण्यात आले.
वाचा-'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO
वाचा-भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO
गेल्या आठवड्यात, अजमानमध्ये एक एसयूव्ही पलटली होती. गाडी पलटल्यानंतर काही क्षणात गाडीनं पेट घेतला. या अपघातात दोन जण जखमी झाले.
वाचा-सावधान! मुंबईच्या रस्त्यांवर धावतोय मृत्यू... CCTV मध्ये कैद झाली भयंकर घटना
हा अपघात झाल्यानंतर अडीच मिनिटांत पोलीस, रुग्णवाहिका व नागरी संरक्षण पथक दाखल झाले. पथक दाखल होताच त्यांनी ड्रायव्हर आणि प्रवाश्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार हलवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.