मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईत कांदिवली परिसरात मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. शनिवारी दुपारी जवळपास पावणे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यावर बसवण्यात आलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. हेही वाचा.. मी पुन्हा येईन… असं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं कांदिवली हायवेवर एका दुचाकीवरून दोघे जात होते. तितक्यात रस्त्याच्या बाजूला ठेवलेले मेट्रोचे बॅसाट्याच्या वाऱ्यामुळे चालत्या दुचाकीवर पडले. त्यामुळे दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती मागून येणाऱ्या ट्रकच्या चाका खाली चिरडला गेला. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अवघ्या 14 सेकंदात घडली.
मुंबई- मेट्रोच्या कामासाठी लावलेला दुभाजक अंगावर पडून एका बाईक स्वाराचा कांदिवलीत शनिवारी मृत्यू झाला. pic.twitter.com/1YJyGXtZ04
— News18Lokmat (@News18lokmat) September 12, 2020
अनेकदा नागरिकांनी तक्रार देऊन देखील मेट्रो प्रशासनाकडून रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या बॅरिकेटिंग बाजूला केल्या जात नाही आहेत. अत्यंत बेजबाबदारपणे हायवेवर बॅरेकेटिंग ठेवण्यात आल्या आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. अधून मधून सोसाट्याचा वाराही सुटतो. त्यामुळे या बॅरिकेटिंग हायवे वरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडण्याच्या घटना कायम घडत असतात. तरी देखी मेट्रो प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही आहे. हेही वाचा.. VIDEO रस्त्यावरची कार बघता बघता गेली वाहून; अवघ्या तासाभराच्या पावसाचा कहर अवघ्या 14 सेंकदात झालं होत्याचं नव्हतं.. ही घटना अवघ्या 14 सेकंदात घडली. एका निरपराध व्यक्तीला मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हि़डिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. दरम्यान, संपूर्ण मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.