'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO

'आम्ही उतरलो अन् कार लॉक झाली', भररस्त्यात कारनं घेतला पेट, पाहा थरारक VIDEO

कारमधून अचानक धूर आणि आणि...थोडक्यात वाचला जीव पाहा थरारक VIDEO

  • Share this:

लखनऊ, 13 सप्टेंबर : रस्त्यावर चालणाऱ्या BMW कारने अचानक पेट घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहानं जात असताना BMW कारनं अचानक पेट घेतला आणि गोंधळ उडाला. या घटनेची माहिती स्थानिक आणि कार चालकानं अग्निशमन दलाला दिली. या कारमधून जाणाऱ्या दाम्पत्यानं आपला जीव वाचवला आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये BMW कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कामाच्या निमित्तानं घरातून दुकानाकडे निघाले होते. याचदरम्यान रस्त्यात कारमधून अचानक धूर येऊ लागला. काय करावं काही सुचेनासं झालं. दाम्पत्यानं तातडीनं BMW कार सेंटरला फोन लावला आणि या संदर्भात माहिती दिली.

हे वाचा-भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

सर्व्हिस सेंटरकडून फोनवर कारमधील बॅटरीची वायर काढण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी दाम्पत्य गाडीतून उतरलं आणि बोनेटपर्यंत पोहोचण्याआधीच गाडी ऑटोलॉक झाली आणि कारनं अचानक पेट घेतला. BMW कारच्या बॅटरीची तार ही मागच्या बाजूला असते याची माहिती दाम्पत्याला नव्हती. मात्र गाडीतून उतरल्यामुळे या दाम्पत्याचा जीव वाचला.

अग्निशन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीनं दाखल होत त्यांनी पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवलं. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याची माहिती मिळत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 13, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading