भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

भरधाव ट्रकनं बाईकस्वाराला चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO

चालकाला अपघात होणार याची पूर्वकल्पना येताच तो दुचाकी वळवण्याचा प्रयत्न करतो मात्र वेगात असणारा ट्रक या दुचाकीला चिरडून पुढे जातो.

  • Share this:

सोलन, 13 सप्टेंबर : अनलॉक 4 चा टप्पा सुरू झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत भरधाव ट्रकनं समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकच्या एकदम समोर दुचाकी आली. चालकानं ट्रकवर नियंत्रण मिळवेपर्यंत भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं होतं.

भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालकाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. ही दुर्घटना हिमाचल प्रदेशातील नालागड परिसरात घडली आहे.

हे वाचा-सावधान! मुंबईच्या रस्त्यांवर धावतोय मृत्यू... CCTV मध्ये कैद झाली भयंकर घटना

नालागडमधील भरतगड रोडवरील धाना गावत एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. सीसीटीव्हीमध्ये पाहू शकता वेगात असणारा ट्रक वळण घेऊन पुढे येत असताना अचानक समोर दुचाकी येते. चालकाला अपघात होणार याची पूर्वकल्पना येताच तो दुचाकी वळवण्याचा प्रयत्न करतो मात्र वेगात असणारा ट्रक या दुचाकीला चिरडून पुढे जातो. या घटनेमध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे वाचा-दुचाकीला धडक देऊन कार हवेत उडाली आणि 6 वेळा पलटली, अपघाताचा LIVE VIDEO

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. वळण असताना वारंवार वेग कमी ठेवून गाड्या चालवण्याचं आवाहन करूनही बऱ्याचदा वेगावर नियंत्रण ठेवलं जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघाड घडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 13, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading