• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • जगातील फक्त दोनच देशांत विकला जात नाही Coca Cola, कारणं आहेत रोमांचक

जगातील फक्त दोनच देशांत विकला जात नाही Coca Cola, कारणं आहेत रोमांचक

जगभरात लोकप्रिय असणारं कोका कोला हे पेय (Two countries in the world where coca cola in banned) जगातील केवळ दोनच देशांमध्ये विकलं जात नाही.

 • Share this:
  जगभरात लोकप्रिय असणारं कोका कोला हे पेय (Two countries in the world where coca cola in banned) जगातील केवळ दोनच देशांमध्ये विकलं जात नाही. आपल्या लोकप्रिय उत्पादनांमुळे (Various products of Coca Cola) जगभरात व्यापार करणाऱ्या कोकाकोला कंपनीला या दोन देशांमध्ये कधीच प्रवेश करता आला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी ग्रामीण भागातदेखील कोकाकोला कंपनीची उत्पादनं पोहोचली. मात्र या दोन देशांत ती का गेली (Two countries with no Coke) नाहीत, यामागचा इतिहास फारच रोमांचक आहे. क्युबामध्ये आहे बंदी जगात कोकाकोला मिळत नसणाऱ्या दोन देशांपैकी एक आहे क्युबा. वास्तविक, 1906 साली कोकाकोला कंपनीनं क्युबामध्ये उत्पादन सुरू केलं होतं. त्याचा प्रतिसाददेखील बऱ्यापैकी मिळत होता. मात्र 1962 साली क्युबामध्ये क्रांती झाली. या क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी सर्व परदेशी कंपन्यांविरोधात नारा दिला. क्युबामध्ये असणाऱ्या सर्व विदेशी कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आणि ती राष्ट्रीय संपत्तीत विलीन करण्यात आली. त्यावेळी कोकाकोलाचं उत्पादन थांबलं आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी देश सोडला. एकाही परदेशी कंपनीसोबत व्यवहार करू नये, असा आदेश क्युबाच्या शासनानं काढला. तर त्यानंतर अमेरिकेनंदेखील आदेश काढत क्युबासोबत कुठलेही व्यवहार करायला मनाई केली. त्यामुळे आजही क्युबामधअये कोकाकोला कंपनीची उत्पादनं पोहोचू शकत नाहीत. उत्तर कोरियातही मिळत नाही कोकाकोला 1950 ते 1953 या कालावधीत कोरियायी युद्ध सुरू होतं. या काळात अमेरिकेनं कोरियावर व्यापारी निर्बंध लादले होते. त्यानंतर 1980 साली उत्तर कोरियानं दक्षिण कोरियवर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर तर अमेरिकेनं हे निर्बंध अधिकच कडक केले आणि कुठल्याही अमेरिकी कंपनीला उत्तर कोरियात व्यापार करण्यास मनाई केली. त्यामुळे या देशांतही कोकाकोला मिळत नाही. हे वाचा-BSNL Apprenticeship: BSNL मध्ये इंजिनिअर आणि डिप्लोमा उत्तीर्णांसाठी मोठी संधी या देशांतही मिळत नव्हता कोक म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांमध्येदेखील अनेक वर्षं कोकाकोलाला परवानगी नव्हती. मात्र 2012 साली म्यानमानवरील आणि 1994 साली व्हिएतनामवरील निर्बंध उठवले. तेव्हापासून या देशांत कोकाकोला मिळायला सुरुवात झाली.
  Published by:desk news
  First published: