हैदराबाद, 22 नोव्हेंबर: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL Apprenticeship) अर्थात BSNL, हैदराबादने अभियांत्रिकीमधील पदवीधर/डिप्लोमा धारकांसाठी पदवीधर आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थींच्या (BSNL Apprentice recruitment 2021) भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. नोटीसनुसार 2019 आणि 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या जागा रिक्त आहेत.. याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये (Electronics and Telecommunication Engineering Jobs) पदवी किंवा डिप्लोमा केलेल्यांची भरती केली जाईल. यासाठी एकूण 22 पदे रिक्त आहेत. भारत संचार निगमच्या म्हणण्यानुसार, शिकाऊ पदांसाठी अर्ज ऑनलाइन करायचे आहेत.
उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. किंवा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान डिप्लोमा असावा.
ही प्रशिक्षणार्थी भरती शिकाऊ प्रशिक्षण कायदा 1973 नुसार एक वर्षासाठी असेल.
Central Railway Recruitment: मध्य रेल्वे भुसावळ विभाग इथे विविध पदांसाठी भरती
अर्जानंतर निवडलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी ८ डिसेंबर २०२१ रोजी CGMT, द्वार संचार भवन, नामपल्ली स्टेशन रोड, हैदराबाद येथे होईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पडताळणी केली जाईल.
काही महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 20 नोव्हेंबर 2021
NATS पोर्टलवर नावनोंदणीची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021
भारत संचार निगम लिमिटेड मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 डिसेंबर 2021
प्रमाणपत्र पडताळणी - 8 डिसेंबर 2021
स्टेशन यादी हस्तांतरित करण्याची तारीख - 10 डिसेंबर 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.