पुणे, 06 फेब्रुवारी : ‘चाईल्ड पॉर्नोग्राफी’वर बंदी असताना असताना दररोज असे प्रकार उघडकीस आलेले पाहायला मिळतात. बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. दरम्यान सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात चाईल्ड पार्नोग्राफीचे 100 ते 150 व्हिडिओ अपलोड झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून ही माहिती उघड केली. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. राजकुमार पुट्टीलाल आणि मनोजकुमार सरोज या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. वाचा- भारताची प्रगती नक्की कुठे? 5 महिन्यात तब्बल 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड असे ठरवले जाते चाइल्ड पोर्नोग्राफी आहे की नाही ही माहिती जमवण्यासाठी इंटरनेट सेवा देणाऱ्यांपासून ते विविध सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. यात नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून या व्हिडीओची तपासणी केली जाते. बाल पोर्नोग्राफी अंतर्गत मुलांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायदा लागू करण्यात आला आहे. यात लहान मुलांचे फोटो, व्हिडिओ, डिजिटल किंवा संगणक-निर्मित प्रतिमा जी वास्तविक मुलांसारखी दिसत आहे, यांचा समावेश होतो. वाचा- तो पुन्हा आला! महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाला सुरुवात 5 महिन्यात तब्बल 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड अमेरिकेने चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित एक धक्कादायक आकडेवारी भारताला दिली आहे. भारतासोबत शेअर केलेल्या अहवालानुसार गेल्या 5 महिन्यांत 25 हजाराहून अधिक चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ भारतातील वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटेड चिल्ड्रन ऑफ अमेरिकाने (NCMEC) हा डेटा राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो ऑफ इंडियाला दिला आहे. हा डेटा शेअर करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने मागील वर्षी करार केला होता. वाचा- सावधान! लग्नासाठी 18 वरीस धोक्याचं, 21 वं मोक्याचं एकट्या मुंबईत 500 प्रकरणे गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 7 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये सर्वात जास्त प्रकरणे उघडकीस आली आली. मुंबईमध्ये गेल्या पाच महिन्यात 500 प्रकरणे समोर आली आहेत. तर, दिल्ली, गुजरात आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. छापे मारण्यास सुरुवात गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित अटक करण्यात आली आहे. याचसंदर्भात गेल्या वर्षी NCMECशी करार करण्यात आला होता. 23 जानेवारीपर्यंत गेल्या पाच महिन्यांत अशी 25 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे की, हा डेटा प्रथमच समोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.