सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

सारा-कार्तिकनं रणवीर सिंहपासून लपवलं होतं 'हे' सत्य, आता झाला खुलासा

सारा अली खाननं कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर रणवीर सिंहनं एका पार्टीमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं तिच्या करिरची सुरुवात केदारनाथ सिनेमातून केली होती. या सिनेमात तिनं अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं त्यानंतर तिनं सिंबामध्ये काम केलं. मागच्या वर्षी सारानं वडील सैफ अली खानसोबत बहुचर्चित कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता कार्तिक आर्यनवर क्रश असल्याची कबुली तिनं दिली होती.

कॉफी विथ करणमध्ये सारानं संधी मिळाली तर मला कार्तिकला डेट करायला आवडेल असंही यावेळी म्हटलं होतं. या शोनंतर काही दिवसातच जेव्हा सारा आणि रणवीर सिंबामध्ये काम करत होते त्यावेळी रणवीरनं एका पार्टीमध्ये सारा-कार्तिकची भेट घडवून आणली होती. त्यांच्या या भेटीचे व्हिडीओ सुद्धा त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यामध्ये असं काही सत्य होतं जे सारा आणि कार्तिकनं रणवीर पासून लपवून ठेवलं होतं. पण आता याचा खुलासा झाला आहे.

घटस्फोटानंतर अरबाज खानबद्दल मलायका अरोरा म्हणते...

सारा आणि कार्तिकचा आगामी सिनेमा लव्ह आजकलचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत सारानं रणवीर पासून लपवलेल्या सत्याचा खुलासा केला आहे. सारा म्हणाली, रणवीरनं कार्तिकसोबत तिची भेट घडवून आणण्याआधीच हे दोघंही एकमेकांना भेटले होते. पण जेव्हा रणवीरनं त्यांची भेट घडवून आणली त्यावेळी त्यांनी रणवीरला वाईट वाटू नये यासाठी हे सत्य त्याच्यापासून लपवलं.

PHOTOS : 'पटाखा गर्ल'चा Traditional अंदाज, होणाऱ्या सासूबरोबर केली एंट्री!

View this post on Instagram

#HaanMainGalat ❤️ . . Out tomorrow #LoveAajkal 🕺🏻💃🏻🔥

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी सारा-कार्तिक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये सुद्धा दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीनं सारा-कार्तिकच्या जोडीला चेन्नई एक्स्प्रेसच्या सिक्वेलसाठी साइन करण्याची इच्छा बोलून दाखवली. असं झाल्यास सारा-कार्तिकची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसेल.

नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी काय विचार करतो अंगद बेदी

First published: February 6, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या