हजारोंचा जीव घेणाऱ्या कोरोनामुळे वाचली मुलीची इज्जत, बलात्कार करण्यासाठी बेडरूममध्ये घुसला तरुण आणि...

हजारोंचा जीव घेणाऱ्या कोरोनामुळे वाचली मुलीची इज्जत, बलात्कार करण्यासाठी बेडरूममध्ये घुसला तरुण आणि...

चीनमधील (China) वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरस हा (Coronavirus) साथीचा रोग वाऱ्यासारखा पसरत आहे. मात्र धक्कादायक म्हणजे याच कोरोनाव्हायरसने एका मुलीची इज्जत वाचवली.

  • Share this:

वुहान, 06 फेब्रुवारी : चीनमधील (China) वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरस हा (Coronavirus) साथीचा रोग वाऱ्यासारखा पसरत आहे. आतापर्यंत या विषाणूने तीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर हजारो लोकांना याची लागण झाली आहे. एवढेच नाही तर जवळ जवळ चीनमधील सर्व शहरे निकामी करण्यात आली आहे. मात्र धक्कादायक म्हणजे याच कोरोनाव्हायरसने एका मुलीची इज्जत वाचवली.

तुम्ही विचारत करत असाल की, चीनसह संपूर्ण जग घाबरलेल्या या प्राणघातक परिणामामुळे एका तरूणीचे आयुष्य कसे वाचले? तर, चीनच्या वुहानमध्ये एक तरुण एका महिलेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने आला आणि त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. हा युवक बळजबरी करत असल्याचे पाहून घाबरलेल्या मुलीने खोकला येत असल्याचा अभिनय केला. तसेच, कोरोना व्हायरसने पीडित असल्याचा आव आणला. मुख्य म्हणजे या युवतीची ही युक्ती कामी आली आणि कोरोना विषाणूमुळे पीडित असल्याचे ऐकताच त्या तरुणीने पळ ठोकला.. संशयित आरोपीचे नाव शिओ असे सांगितले जात आहे, ज्याचे वय सुमारे 25 वर्षे आहे.

वाचा-चीनमुळे संपूर्ण जगात पसरला कोरोनाव्हायरस, 30 तासांचे नवजात बाळ गर्भातच झाले रुग्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वुहान शहरातच आरोपींनी मुलीच्या घरात घुसून बेडरूममध्ये प्रवेश केला. तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. जेव्हा महिलेला पळून जाण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा तिने अचानक सांगितले की तिला कोरोना विषाणूचा त्रास आहे, त्यानंतर आरोपी तिला सोडून निघून गेला आणि लगेचच पळून गेला.

वाचा-TikTok चं सगळ्यात खतरनाक चॅलेंज, डोळ्यांशी अशी मस्ती केली तर व्हाल कायमचे आंधळे

पीडित मुलीने सांगितले की आरोपींनी तिला पकडताच तिने आरडा ओरडा केला की ती नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे आणि तिला प्राणघातक कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. हे ऐकताच आरोपींनी त्याला तातडीने सोडले.

वाचा-3 वर्षाची चिमुरडी झगडतेय विचित्र आजाराशी, हातांनी करू शकत नाही कोणतंच काम

मृतांचा आकडा 563 वर पोहोचला

गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या नवीन संशयित प्रकरणांची संख्या कमी झाल्याचा दावा चीनने बुधवारी केला. याने आशा व्यक्त केली आहे की, प्रभावी उपायांमुळे त्याचा प्रसार नियंत्रित करण्यात मदत होईल. त्याच वेळी, देशात मृतांची संख्या 563 वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढत असताना, हाँगकाँगने म्हटले आहे की, चीनमधून येणाऱ्या सर्व लोकांना शनिवारपासून दोन आठवड्यांसाठी कुटुंबापासून स्वतंत्र देखरेखीखाली राहावे लागेल. या देशांमधून कोरोना विषाणू इतर देशांमध्येही पसरला आहे. जपानमधील कोरोना विषाणूची लागण 34, थायलंडमध्ये 25, सिंगापूरमध्ये 24, दक्षिण कोरियामध्ये 19, ऑस्ट्रेलियामध्ये 14, जर्मनीमध्ये 12, अमेरिकेत 11, तैवानमध्ये 11, मलेशियामध्ये 10, व्हिएतनाममध्ये 10, फ्रान्समध्ये 6 अशी झाली. अरब अमिरातीमध्ये 5, कॅनडामध्ये4, भारतात 3, फिलिपिन्समधील 3(एका मृत्यूसह), रशियामधील 2, इटलीमधील 2, ब्रिटनमधील 2, बेल्जियममध्ये 2, नेपाळमध्ये 2, श्रीलंकेत 1 आणि फिनलँडमध्ये 1 प्रकरणे आढळून आली आहेत.

First published: February 6, 2020, 10:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या