कोरोनाच्या थैमानात आणखी भीषण नैसर्गिक आपत्ती! शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा

कोरोनाच्या थैमानात आणखी भीषण नैसर्गिक आपत्ती! शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर आता किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

टोकियो, 22 एप्रिल : जपानमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर आता किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपान सरकारच्या समितीने या भूकंपामुळे पॅसिफिक महासागरात महाकाय लाटा उसळू शकतात. जपानच्या उत्तर आणि ईशान्य भागात यामुळे धोका निर्माण झाला आहे.

जपानमध्ये काल रात्री मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 9 एवढी मोजली गेली. त्यामुळे आता त्सुनामीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भूकंपामुळे 30 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतील, असं सरकारी अंदाजात वेधशाळेनं म्हटलं आहे.

फुकुशिमा अण्विक केंद्राला या त्सुनामीपासून धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे न्यूक्लिअर स्टेशन त्सुनामीच्या टप्प्यात आहे का याविषयी आता चाचपणी सुरू झाली आहे. जपान सरकारने दिलेल्या ताज्या अंदाजाप्रमाणे 11 मीटर उंचीच्या म्हणजे साधारण 36 फूट भिंत बांधून लाटा अडवता येतील का याविषयी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.

'Corona ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण...', कोरोना योद्धांनी मांडली व्यथा

कोरोनाव्हायरसबाबत धक्कादायक संशोधन, 'या' क्षेत्रात झाले सर्वाधिक मृत्यू

First published: April 22, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading