Home /News /national /

'Coronavirus ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण...', कोरोना योद्धांनी मांडली आपली व्यथा

'Coronavirus ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण...', कोरोना योद्धांनी मांडली आपली व्यथा

Coronavirus पासून रुग्णांना वाचवताना काही डॉक्टरांवरही या व्हायरसने हल्ला केला आहे. फक्त हे डॉक्टर नाही, तर त्यांचं कुटुंबही भीतीच्या सावटात आहे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : देशभरातील डॉक्टर (doctor), नर्स (nurse), आरोग्य कर्मचारी (health workers) कोरोना रुग्णांसाठी (corona patient) झटत आहेत. दिवसरात्र एक करून त्यांच्यावर उपचार करत आहेत. कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) त्यांची ही लढाई कोणत्या युद्धापेक्षा कमी नाही. अशाच कोरोना योद्धांनी आपली व्यथा मांडली आहे. कोरोनाव्हायरसपासून रुग्णांना वाचवताना काही डॉक्टरांवरही या व्हायरसने हल्ला केला आहे. फक्त हे डॉक्टर नाही, तर त्यांचं कुटुंबही भीतीच्या सावटात आहे. मात्र या डॉक्टरांना आपल्याला कोरोनाव्हायरसची लागण होईल किंवा त्यामुळे मृत्यू होईल याची नाही तर कोरोनाव्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेहरी कोणी स्वीकारणार नाही, याची आहे. युद्धाच्या रणांगणात आहोत डॉ. सुमित कुमार (नाव बदललेलं) यांनी सांगितलं, "आम्ही या लढाईतील सैनिक आहोत आणि आम्हाला हा लढा जिंकायचाच आहे. मात्र त्यासाठी आम्हाला आधी दररोज भीतीवर मात करावी लागते. शहरांप्रमाणे रुग्णालयातही झोन आहेत. रेड झोन जिथं कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तिथं जाणं म्हणजे एखाद्या युद्धाच्या रणांगणावर जाण्याप्रमाणेच आहे. इथली परिस्थिती कशी असते, हे शब्दात सांगणं अशक्य आहे. या झोनमध्ये घुसण्यापूर्वी पीपीई किट घालतानाच मनात अनेक विचार घर करू लागतात" हे वाचा - कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी वापरलं जाणारं 'हे' औषध ठरतंय जीवघेणं 12 तास काहीच खाऊ-पिऊ शकत नाही डॉक्टरांच्या मते, प्रोटेक्टिव्ह किट्स घातल्यानंतर श्वास घेणंही कठीण असतं. त्यात आता गरमी वाढते आहे आणि रेड झोनमध्ये एसीही लावू शकत नाही कारण यामुळे संक्रमणाचा धोका आहे. अशात घामाने अक्षरश: अंघोळच होते. 8 ते 12 तासांच्या ड्युटीमध्ये ना ते काही खाऊ शकत ना पाणी पिऊ शकत, इतकंच नव्हे तर ते टॉयलेटलाही जाऊ शकत नाही. त्यात डॉक्टरांची कमतरता असल्यास ड्युटी रात्री 14 तास आणि दिवसा 10 तासांपर्यंत वाढते. पीपीई किटची कमतरता आणखी एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, पीपीई किट खूप कमी आहेत, त्यामुळे त्यांचा वापर विचारपूर्वक आणि जपून करावा लागतो. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवक्ता डॉ. छवी गुप्ता यांनी सांगितलं की, "पीपीई किट घालणंही सोपं नाही. या किटमुळे आम्हाला व्हायरसपासून संरक्षण मिळतं आहे आणि त्यानुसारच आम्ही काम करतो. एका पीपीई किटची किंमत सरासरी एक हजार रुपये आहे, अशात आम्ही ते लवकर बदलू शकत नाही. हे घातल्यानंतर असं वाटतं की बुलेटप्रुफ कपडेच घातले आहेत" हे वाचा - कौतुक करावं तेवढं थोडं! तब्बल 21 किमी धावून वेळेत ड्युटीवर पोहोचला बस कंडक्टर घरी जाऊ शकतो मात्र कुटुंबाला भेटू शकत नाही. डॉ. गुप्ता म्हणाल्या, "आम्ही सर्व जण हॉटेलमध्ये राहत आहोत. आमची घरं आहेत, मात्र आम्ही घरी जाऊ शकत नाही, कुटुंबाला भेटू शकत नाही कारण त्यांना संक्रमणाचा धोका होईल.  कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान आम्ही सर्वकाही विसरून फक्त ड्युटीवर लक्ष देतो. हे युद्ध आहे आणि युद्ध म्हटलं तर आम्ही घरी कसं जाऊ शकतो" संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या