बर्लिन, 22 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, इटलीसारखे मोठे देशही यामळे प्रभावित झालेत. आता कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. ज्या ठिकाणी वायू प्रदूषणाची (Air pollution) पातळी जास्त आहे, तिथं कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक मृत्यू झालेत; असं एका संशोधनात दिसून आलं आहे.
जर्मनीच्या मार्टिन ल्युथर युनिव्हर्सिटीच्या (Martin Luther University) संशोधकांनी हा अभ्यास केला, जो 'द टोटल एनव्हायरमेन्टल जर्नल'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
डेली मेलनं याबाबत वृत्त दिलं आहे. संशोधकांनी कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा आणि वायू प्रदूषणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली आहे.
हे वाचा - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका
संशोधकांनी जर्मनी, स्पेन, फ्रान्स आणि इटली या देशांमधील मुख्य ठिकाणांचा अभ्यास केल्यानंतर दिसून आलं की, चारही देशातील 5 सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 75 टक्के आहे.
यूएस आणि इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातही वायू प्रदूषण आणि कोरोनाव्हायरसच्या मृत्यूबाबत करण्यात आलेल्या अभ्यासात अशीच परिस्थिती आहे.
मार्टिन ल्युथर युनिव्हर्सिटीचे संशोधक यैरों ओगेन यांनी सांगितलं, "आम्ही युरोपमध्ये कोरोनाव्हायरसची महासाथ येण्यापूर्वी म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीतील डाटा पाहिला. ज्याठिकाणी सर्वात जास्त मृत्यू झालेत, त्या क्षेत्रात नायट्रोजन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे. उत्तर इटली, माद्रिदच्या आसपासचा परिसर आणि मध्य चीनच्या हुबेई प्रांतातही समान परिस्थिती दिसून आली. हे क्षेत्र अशा ठिकाणी आहेत, जिथं वायू स्थिर आणि वायू प्रदूषण जास्त असू शकतं"
हे वाचा - लॉकडाऊनमुळे ऑनलाइन डेटिंग करताय, 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा
"नायट्रोजन डायऑक्साइड आणि कोरोनाव्हायरस श्वसनप्रणालीला प्रभावित करतो. वायू प्रदूषण आणि कोरोनाव्हायरसमुळे होत असलेले मृत्यू यांच्यामध्ये संबंध असू शकतो", असंही ओगेन म्हणाले.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.