जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेत शाळांमधून गायब होतायत वस्तू, TIKTOK VIDEO तून उलगडलं रहस्य

अमेरिकेत शाळांमधून गायब होतायत वस्तू, TIKTOK VIDEO तून उलगडलं रहस्य

अमेरिकेत शाळांमधून गायब होतायत वस्तू, TIKTOK VIDEO तून उलगडलं रहस्य

अमेरिकेतील शाळांमध्ये सध्या अनेक वस्तूंची चोरी आणि मोडतोड (Thefts are rising in American schools) होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमागे नेमकं कोण आहे, हे अनेक दिवस कुणालाही समजत नव्हतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

न्यूयॉर्क, 19 सप्टेंबर : अमेरिकेतील शाळांमध्ये सध्या अनेक वस्तूंची चोरी आणि मोडतोड (Thefts are rising in American schools) होत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमागे नेमकं कोण आहे, हे अनेक दिवस कुणालाही समजत नव्हतं. त्यानंतर एका टिकटॉक व्हिडिओमुळे हे (TikTok videos of steeling things from schools) प्रकार होत असल्याचं लक्षात आल्यावर सर्वांनाच धक्का बसला आहे. एका टिकटॉक युजरनं त्याच्या शाळेत केलेल्या चोरीचा व्हिडिओ अपलोड करत इतरांनाही असाच प्रकार करून व्हिडिओ तयार करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये चोरी करण्याचं जणू पेवच फुटलं आहे. चोरीचं चॅलेंज गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात एका युजरने आपल्या शाळेतून डिस्पोजेबल मास्कचा एक बॉक्स चोरून आणल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर #deviouslicks नावाच्या ट्रेंडने हा व्हिडिओ जोरदार शेअर झाला. आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 39 हजार जणांनी पाहिला आहे. त्यानंतर काहीजणांनी शाळेतून सॅनिटायझर पळवून आणल्याचा व्हिडिओ शेअर केला. गेल्या काही दिवसांत तर अशा प्रकारे शाळेत चोरी करून व्हिडिओ पोस्ट कऱण्याचं चांगलंच पेव फुटलं आहे.

जाहिरात

एका महिन्यात 94 हजार व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर गेल्या महिनाभरात 94 हजारपेक्षा जास्त व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. एकच हॅशटॅग वापरून विद्यार्थी हे व्हिडिओ शेअर करत असल्याचा परिणाम अमेरिकेत जाणवतो आहे. अनेक विद्यार्थी अशा चोऱ्या करायला प्रवृत्त होत असून शिक्षकांच्या डोक्याला याचा चांगलाच ताप झाला आहे. हे वाचा - काबुल विमानतळावरील आत्मघातकी हल्लेखोर होता भारतातील तुरुंगात, ISIS चा दावा शाळांकडून कारवाई मुलं अनेक दिवस राहिल्यामुळे थोडीशी मौजमजा म्हणून असे प्रकार होत असतील, असं सुरुवातीला शिक्षकांना वाटत होतं. मात्र हे प्रकार वाढायला लागल्यानंतर शाळांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. मुलांनी चोरी केली आणि शाळेतील वस्तूंची मोडतोड केली, तर आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गंभीर प्रकारांसाठी शाळेतून काढून टाकण्याचा इशारादेखील शाळा देऊ लागल्या आहेत. कॅलिफोर्नियापासून ते जॉर्जियापर्यंत सर्वत्र हा प्रकार सुरु झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात